loader
Breaking News
Breaking News
Foto

आदईचे शेकाप उपसरपंच विलास शेळके यांचा समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश

पनवेल (प्रतिनिधी) -आदई ग्रुप ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच व शेकापचे नेते विलास शेळके यांनी आपल्या समर्थकांसह भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. आमदार प्रशांत ठाकूर आणि भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांनी पक्षाची शाल देऊन त्यांचे स्वागत केले. या प्रवेशामुले शेकापला मोठा झटका बसला आहे. पनवेल शहरातील रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात झालेल्या या पक्षप्रवेश कार्यक्रमाला भाजपचे राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत, नेरे मंडळ अध्यक्ष भूपेंद्र पाटील, अनुसूचित जाती सेलचे जिल्हाध्यक्ष अमित जाधव, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष आनंद ढवळे, भाजप तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, यतीन पाटील, अंकुश ठाकूर, भाईशेठ पाटील, सदाशिव पाटील, बाळाराम पाटील, एकनाथ मोकल आदी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या वेळी बोलताना आमदार प्रशांत ठाकूर यांनी, भाजप हा सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा पक्ष असून कार्यकर्तेच पक्षाचा कणा आहेत, असे सांगून विलास शेळके यांच्यासारखे कार्यकर्ते पक्षाची ताकद वाढवतात आणि कार्यकर्त्यांवर चालणारा पक्ष हीच भाजपची ओळख आहे, असे म्हटले. या वेळी आदईचे उपसरपंच विलास शेळके यांच्यासह शेकापचे ज्येष्ठ नेते परशुराम शेळके, दीपक शेळके, विजय पाटील, संतोष म्हात्रे, राजेंद्र शेळके, दिनेश शेळके, नवनाथ पारिंगे, शेकाप उत्तर भारतीय सेलचे चंद्रशेखर चौहान, कमलेश चौहान, अजित चौहान, अमित चौहान, हिरालाल चौहान, रामचंद्र वर्मा, बापू केजळे, अविनाश देसाई, राजेंद्र राजे, किशोर भंडारी, ज्ञानदेव मोरे, संजय मोरे, विजय पंजाबी आदी कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. सर्वांचे स्वागत करण्यात आले.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg