loader
Breaking News
Breaking News
Foto

ओंकार हत्तीवर सुतळी बॉम्ब फेकल्याचा धक्कादायक प्रकार उघड! प्राणीमित्रांमध्ये संतापाची लाट

सावंतवाडी - सावंतवाडी तालुक्यात गेल्या दीड महिन्यांपासून वावरत असलेल्या ओंकार नावाच्या १० ते १२ वर्षांच्या हत्तीवर बांदा येथील तेरेखोल-तुळसाण नदीपात्रात डुंबत असताना सुतळी बॉम्ब फेकून देण्याचा अमानवी आणि भयंकर प्रकार समोर आला आहे. या घटनेचे व्हिडिओ देखील उघडकीस आले असून, सुरुवातीला वनविभागाच्या पथकानेच हे कृत्य केल्याचे बोलले जात आहे. ​ओंकार हत्ती शांतपणे वावरत असताना आणि अनेकदा लोकांना 'नमस्कार-चमत्कार' करत असल्याचे दिलासादायक व्हिडिओ समोर येत असताना, बांदा परिसरात मात्र त्याला हुसकावून लावण्यासाठी थापट मारणे, दंडुका मारणे आणि आता तर चालताना किंवा पाण्यात डुंबत असताना त्याच्या अंगावर सुतळी बॉम्ब फेकणे असे अमानवी प्रकार घडत आहेत. या कृत्यांमुळे प्राणीमित्रांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. ​हत्तीवर प्रेम: काही ठिकाणी लोक ओंकार हत्तीला पाहण्यासाठी गर्दी करत आहेत, त्याच्या पायाच्या ठशांची पूजा करत आहेत आणि केळी खाऊ घालून प्रेम व्यक्त करत आहेत. हत्तीला देवासमान मानणाऱ्यांचे नुकसान झाले नाही, परंतु त्याची हेटाळणी करणाऱ्यांना मात्र नुकसानीस सामोरे जावे लागले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या गंभीर घटनेबद्दल उपवनसंरक्षक मिलीश शर्मा यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. ​प्रश्न: तेरेखोल नदीपात्रात तुळसाण येथे हत्ती डुंबत असताना त्याच्या अंगावर सुतळी बॉम्ब फेकण्याचे अमानवी कृत्य समोर आले, याबाबत काय सांगाल? ​उपवनसंरक्षकांचे उत्तर: "नदीपात्रात बागायतीसाठी पाण्याचे पंप लावलेले आहेत. तिकडे हत्ती जाऊ नये आणि नुकसान करू नये, यासाठी त्याला दिशा बदलून मार्गस्थ करण्यासाठी सुतळी बॉम्ब फेकण्यात आले आहेत." ​दोडामार्ग तालुक्यातील मोर्ले येथे ओंकार हत्तीने एका शेतकऱ्याला तुडवून ठार मारल्यामुळे शासनाने त्याला पकडण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, पर्यावरणप्रेमींनी मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाकडे याचिका दाखल केल्यामुळे हत्ती पकड मोहीम सध्या थंडावली आहे. ​न्यायालयात याचिका दाखल झाली आहे, परंतु हत्तीला पकडणे आवश्यक आहे. ​याबाबतची वस्तुस्थिती न्यायालयात सादर केली जाईल. न्यायालयाने हत्ती पकडण्याची मोहीम हाती घेण्याची गरज असल्याबाबत वस्तुस्थिती दर्शक अहवाल सादर करण्याची अनुमती दिली आहे.

टाइम्स स्पेशल

येत्या दोन-चार दिवसांत हत्तीला पकडण्याची गरज आहे, याबाबत वस्तुस्थितीदर्शक अहवाल कोल्हापूर खंडपीठात सादर केला जाईल.​हत्तीला त्रास देण्याचा प्रयत्न करणाऱ्यांची माहिती गोळा केली जात आहे आणि सर्व संबंधितांवर वन कायद्यांतर्गत कारवाई करण्यात येईल, असे उपवनसंरक्षक मिलीश शर्मा यांनी बोलताना सांगितले. ओंकार हत्ती दोडामार्ग तालुक्यातून सावंतवाडी तालुक्यात आला होता. त्यानंतर त्याने गोवा राज्यातही फेरफटका मारला आणि पुन्हा सावंतवाडी तालुक्यात दाखल झाला. सध्या तो बांदा परिसरात वावरत असून, सावंतवाडी तालुक्यातील कास, सातोसे, मडुरा, रोणापाल, इन्सुली, वाफोली आणि भालवल परिसरातही त्याने फेरफटका मारला आहे. ​हत्तीला त्रास देणाऱ्यांवर वनविभाग काय कारवाई करते आणि न्यायालयात वस्तुस्थिती अहवाल सादर झाल्यावर हत्ती पकड मोहीम पुन्हा सुरू होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg