loader
Breaking News
Breaking News
Foto

अजय दळवी यांचा ठाणे येथील कार्यक्रमात सर्वोत्कृष्ट संस्थाचालक पुरस्काराने सन्मान

मंडणगड (प्रतिनिधी) - दळवी एज्युकेशनल अँण्ड चँरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष अजय दळवी यांचा भाजपा शिक्षक आघाडी कोकण विभाग आणि समन्वय प्रतिष्ठान यांच्या वतीने ठाणे येथील एम. एच. हायस्कूल येथे आयोजीत गुणगौरव सोहळ्यात वसंत स्मृती गुणगौरव पुरस्कार 2025 कोकणातील सर्वोत्कृष्ट संस्थाचालक या पुरस्काराने गौरव करण्यात आला. या कार्यक्रमास ठाणे शहर आमदार संजय केळकर, खासदार विनय सहस्रबुद्धे, शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, कोकण पदवधीर मतदार संघाचे आमदार निरंजन डावखरे, ठाणे पालघर महाराष्ट्र माथाडी जनरल कामगार संघाचे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले, भाजपा शिक्षक आघाडी सहसंयोजक विकास पाटील, प्रदेश प्रवक्ते सुजय पतकी, विजय जाधव, सुधीर घागस, नगरसेवक अमित सरैया, भाजपा ठाणे उपाध्यक्ष मनोहर सुगदरे, कोकण पदवीधर प्रकोष्ठ संयोजक सचिन मोरे, जयेंद्र कोळी, मृणाल पेंडसे, शिक्षक आघाडीचे कोकण विभाग पदाधिकारी आणि अनेक मान्यवर उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

कार्यक्रमास उपस्थित आमदार संजय केळकर व न्यवरांचे हस्ते हा पुरस्कार दळवी यांना प्रदान करण्यात आला. दळवी एज्युकेशनल अँण्ड चँरिटेबल ट्रस्टचे माध्यमातून तालुक्यातील शेनाळे येथे सुरु कऱण्यात आलेल्या महाराष्ट्र पॉलीटेक्नीक महाविद्यालयाचे माध्यमातून ग्रामिण व डोंगराळ भागातील विद्यार्थ्यांना रोजगाराभीमुख उच्च तंत्र शिक्षण व रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी अजय दळवी यांनी मोठे कार्य केले आहे. कोट विधान परिषदेचे माजी उपसभापती, दिवंगत स्व. वसंतराव डावखरे साहेब यांच्या स्मृत्यर्थ, भाजपा शिक्षक आघाडी–कोकण विभाग आणि समन्वय प्रतिष्ठान यांच्यावतीने 2018 पासून सुरू झालेल्या या उपक्रमाच्या माध्यमातून कोकणाच्या प्रत्येक कोपऱ्यातील सर्जनशील शिक्षक आणि संस्थाचालकांचा सन्मान होत आहे.

टाइम्स स्पेशल

कोकणातील दुर्गम भागांपासून ते शहरी शाळांपर्यंत, नवनवीन शैक्षणिक प्रयोग आणि नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून विद्यार्थ्यांचे उज्वल भविष्य घडविणाऱ्या शिक्षकांचा या कार्यक्रमात सन्मान करण्यात येतो. विकासापासून वंचीत तालुक्यास मुळ प्रक्रीयेत आणण्यासाठी सुरु असलेल्या प्रयत्नांची दखल या पुरस्काराने निमीत्ताने घेण्यात आल्याचे दळवी यांनी पुरस्कार स्विकारल्यानंतर सांगीतले आहे. दरम्यान राज्यस्तरातील एका मोठ्या मान्यतप्राप्त संस्थेने दिलेल्या पुरस्काराबद्दल पुर्ण तालुक्यातून अजय दळवी यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg