loader
Breaking News
Breaking News
Foto

राज्यस्तरीय कला उत्सवात दादासाहेब सरफरे विद्यालयाचे सुयश

खेड (प्रतिनिधी)- केंद्र शासनामार्फत माध्यमिक व उच्चमाध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी राष्ट्रीय कला- उत्सवाचे आयोजन केले जाते. या वर्षी जिल्हास्तरीय कला उत्सव पटवर्धन हायस्कूल रत्नागिरी येथे पार पडला. या स्पर्धेत जिल्ह्यातील अनेक माध्यमिक विद्यालये सहभागी झाली होती. यामध्ये दादासाहेब सरफरे विद्यालयातील विद्यार्थी दोन कला प्रकारात सहभागी झाले होते. आकांक्षा योगेश सप्रे व किर्ती प्रसाद देवस्थळी यांचा कथाकथन या स्पर्धेत विभागात प्रथम क्रमांक मिळवत राज्यस्तरीय कला- उत्सव पुणे येथे थेट कोल्हापूर विभागाचे नेतृत्व केलं. पुणे येथे झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत आकांक्षा सप्रे आणि किर्ती देवस्थळी यांनी ' सिता- हनुमान भेट ' या कथेच सादरीकरण करत राज्यात द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे.. गतवर्षी याच राज्यस्तरीय स्पर्धेत कथाकथन मध्ये आकांक्षा सप्रे हिने द्वितीय क्रमांक प्राप्त केला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सदर विद्यार्थ्यांना कला शिक्षक प्रदिप शिवगण यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थाध्यक्ष राजाराम गर्दे, उपाध्यक्ष दिलीप मोरे, सरचिटणीस शरद बाईत, खजिनदार महेश जाधव, सचिव ललितकुमार लोटणकर, संचालक दिनेश जाधव, सचिन मोहिते, मुख्याध्यापक प्रकाश वीरकर, पर्यवेक्षक महावीर साठे यांनी अभिनंदन केले.

टाइम्स स्पेशल

संगमेश्वर तालुक्यातील दादासाहेब सरफरे विद्यालय कला - क्रीडा स्पर्धेत जिल्हा, विभाग आणि राज्य पातळीवर चमक दाखवत असते. सर्वच उपक्रमात विद्यालयाचे विद्यार्थी आपले नैपुण्य दाखवत असतात. त्याच्या यशाबद्दल दशक्रोशीतुन ग्रामस्थ-पालक यांच्याकडुन देखील कौतुक होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg