loader
Breaking News
Breaking News
Foto

आंजर्ले कडयावरील गणपती मंदिरात संकष्टी चतुर्थी निमित्त भाविकांची श्रींच्या दर्शनासाठी गर्दी

दापोली (प्रतिनिधी) - कोकणात रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात आंजर्ले येथील कडयावरील गणपती मंदिरात शनिवारी संकष्टी चतुर्थी निमित्त भाविकांनी श्रींच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. दापोली हे उत्तर कोकणातील महाबळेश्वर, अर्थात थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखले जाते. आंजर्ले या गावाचे मूळ नाव अजरालय असे होते. सध्या आंजर्ले हेच नाव प्रचलित झाले आहे. त्याच आंजर्ल्याच्या एका टेकडीवर श्री गजानन विराजमान आहेत. त्याला सारे जण कड्यावरचा गणपती असेही म्हणतात. या कड्यावरच्या गणपतीची आख्यायिका अशी सांगितली जाते की, आंजर्ले येथील समुद्रकिनारा अवाढव्य व विस्तिर्ण होता. किनाऱ्यावर दोन मंदिरे होती. एक श्री सिद्धिविनायकाचे आणि दुसरे आंजर्लेश्वर, म्हणजे शंभू महादेवाचे. कालांतराने समुद्राची वाढ झाली तशी मंदिरे पाण्याखाली जाऊ लागली .मंदिरे समुद्रात जाताच श्री सिद्धिविनायकाने किनाऱ्यासमोरच्या कड्यावर जाऊन मुक्काम केला, एका कातळावर उमटलेले पाऊल हे श्री सिद्धिविनायकाचे असून समुद्रातून वर येताना हे पाऊल उमटलेले आहे, असा श्री गणेशभक्तांचा विश्वास आहे. त्यानंतर एका गणेशभक्ताने श्री सिद्धिविनायकाची स्थापना कड्यावर केली. गणपती मंदिराचा इतिहास बाराव्या शतकापर्यंत मागे जात असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मंदिरातील श्री गणेशाच्या मूर्तीचे वर्णन शब्दांत करणे तसे कठीणच जाते. श्री गजाननाचे दर्शन घेतल्यानंतर लाभणारी प्रसन्नता आणि शांती या दोन्ही गोष्टी केवळ अनुभवावयच्याच आहेत. गाभाऱ्यातील श्रींच्या मूर्तीवर विलक्षण तेज आढळते. पाच फूट उंचीची मूर्ती पूर्वाभिमुख असून शेजारील रिद्धि सिद्धिच्या मूर्ती सुमारे एक फूट उंचीच्या आहेत.हे मंदीर टेकडीवर असल्याकारणाने आपण दर्शनासाठी टेकडीवर येताच ते आपल्या दृष्टीस पडते. श्रीसिद्धिविनायकाचे मंदिर अर्थात कड्यावरचा गणपती अनेक भक्तांचे श्रद्धास्थान आहे. अशा या आंजर्ले येथील कडयावरील गणपती मंदिरात तसे कायमच भक्त गण हे दर्शनासाठी येत असले तरी विशेषतः संकष्टी चतुर्थी, अंगारकी चतुर्थी निमित्ताने खुपच मोठी दर्शनासाठी गर्दी होत असते तसे आज संकष्टी चतुर्थी असल्याने भाविक भक्त गणांनी दर्शनासाठी मोठीच गर्दी केली होती. कड्यावरील श्री गणपती देवस्थान कमेटी आंजर्ले यांनी उत्तम व्यवस्था ठेवल्याने दर्शनासाठी येथे आलेल्या सर्व भाविक भक्त गणांना अगदी मनोभावे दर्शन घेता आले. हे या देवस्थान कमिटीच्या व्यवस्थापनाचे यश म्हणावे लागेल.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg