loader
Breaking News
Breaking News
Foto

कोकण रेल्वेच्या सर्व कार्यालये, स्थानकात वंदे मातरम्‌चे समूहगान

रत्नागिरी:- वंदे मातरम् या गीताला आज दिडशे वर्षे पूर्ण होत असल्याने कोकण रेल्वेच्या मार्गावरील सर्व स्थानकात आणि कार्यालयांमध्ये वंदे मातरम् गाण्याचे समूहगान करण्यात आले. थोर दिवंगत कवी आणि साहित्यिक बंकिमचंद्र चटोपाध्याय यांनी रचलेल्या वंदे मातरम् गाण्याला आज दिडशे वर्षे पूर्ण झाली.हे गीत प्रथम त्यांनी लिहिलेल्या आनंदमठ नामक त्यांच्या अत्यंत गाजलेल्या कादंबरीचा भाग होते.नंतर हे गाण राष्ट्रगान म्हणून स्वीकारण्यात आले.या गाण्याचा शतकोत्तर सुवर्णमहोत्सव आज ७नोव्हेंबर २०२५ पासून एक वर्षभर साजरा होणार आहे.या निमित्ताने कोकण रेल्वेच्या सर्वच स्थानकात आज विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.कोकण रेल्वेच्या रत्नागिरी विभागीय कार्यालयासह सर्वच स्थानकात रेल्वेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी एकत्र येत या गाण्याचे समूहगान केले.विभागात कार्यालयात विभागात विभागीय व्यवस्थापक शैलेश बापट आणि अन्य अधिकारी कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला.कोकण रेल्वेच्या मार्गावरील सर्वच स्थानकात वंदे मातरम् चे समूहगान करण्यात आले. यावेळी स्थानकांमध्ये उपस्थित असलेले प्रवासी ही या उपक्रमात उत्साहाने सहभागी झाले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg