loader
Breaking News
Breaking News
Foto

आजपासून निवडणुकीची रणधुमाळी; नगरपालिका आणि नगरपंचायतींसाठी अर्ज भरण्यास सुरुवात

मुंबई: राज्यात आजपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी अधिकृतपणे सुरू झाली आहे. राज्यातील 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायतींसाठी होणाऱ्या निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया आजपासून सुरू झाली आहे. 17 नोव्हेंबर अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असणार आहे.या निवडणुकांमुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापयला सुरुवात झाली आहे.राज्यात सत्ताधारी महा यूती भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि विरोधी मविआ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि काँग्रेस) या दोन्ही आघाड्यांमध्ये अद्याप युतीबाबत ठोस निर्णय झालेला नाही. त्यामुळे स्थानिक पातळीवर नवी राजकीय समीकरणे जुळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार उमेदवारी अर्जांच्या छाननीची प्रक्रिया 18 नोव्हेंबरला होणार आहे, तर अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत 20 नोव्हेंबर असेल. त्यानंतर उमेदवारांची अंतिम यादी जाहीर होईल.

टाइम्स स्पेशल

कोकण विभागस्तरावर ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात निवडणूक यंत्रणा सज्ज झाली असून निवडणूक कार्यालयामध्ये उमेदवारी अर्ज भरण्याबाबत हालचालींना वेग आला आहे. आजपासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु झाल्याने आता पक्ष आणि अपक्ष उमेदवार अर्ज दाखल करणार आहेत, त्यांच्याकडे आता मतदारांचे लक्ष केंद्रीत झाले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg