loader
Breaking News
Breaking News
Foto

नमन रंगमंचावर अवतरतेय मामा-भाच्याची अनोखी जोडी!

संगमेश्वर (मकरंद सुर्वे) - कोकणच्या समृद्ध लोककलेचा वारसा जपण्यासाठी अखंड परिश्रम करणारे शिवशंभो नमन मंडळ पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. पोलादपूर, गुहागर, रत्नागिरी, चिपळूण आणि सावर्डे येथे आपल्या रंगतदार कलाकृतींची छाप पाडल्यानंतर आता हे मंडळ मुंबईत पदार्पण करणार आहे. या विशेष कार्यक्रमात नमन रंगमंचावर अवतरणार आहे मामा-भाच्याची एक अनोखी जोडी! उत्साह, विनोद आणि कलागुणांची मेजवानी घेऊन ही जोडी प्रेक्षकांची मने जिंकण्यासाठी सज्ज आहे. रंगतदार सादरीकरण, गाणी आणि विनोदी अभिनय यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम ठरणार आहे अविस्मरणीय.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मंडळात १७ कलाकारांचा सहभाग असून, लहान कलाकारांचे कौशल्य पाहून रसिक प्रेक्षक भारावून जात आहेत. जितेंद्र महाडिक यांचे सुरेल गायन वातावरण रंगवते, तर गण-गौळणींचे अफलातून सादरीकरण आणि पेंद्या सुदाम यांची मिमिक्री प्रेक्षकांच्या टाळ्या ओसंडून वाहायला लावते. यासोबतच ‘बाळकृष्णा’ची भूमिका रंगमंचावर उठावदार ठरत असून, बालकलाकारही आपली छाप उमटवत आहेत. शिवशंभो नमन मंडळ केवळ मनोरंजनच करत नाही, तर लोककलेतील परंपरा, नृत्य, संगीत आणि मिमिक्रीचा संगम प्रेक्षकांसमोर सादर करून कोकणातील सांस्कृतिक वारसा जपण्याचे कामही करते. २५ नोव्हेंबर रोजी मुंबईत या मंडळाचे भव्य सादरीकरण होणार असून, या निमित्ताने कोकणच्या लोककलेला एक नवीन ओळख मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg