loader
Breaking News
Breaking News
Foto

तिसंगी पंचायत समिती गणातून इंदिरा काँग्रेसचे चंद्रकांत मोरे

खेड : - तालुक्यातील सुकीवली जिल्हा परिषद गटांत असणा-या तिसंगी पंचायत समिती गणातून तालुक्यात‌ वडगांव बुद्रुक येथील सेवानिवृत्त एस. टी कर्मचारी चंद्रकांत लक्ष्मणराव मोरे यांना इंदिरा काँग्रेसच्या वतीने उमेद‌वारी जाहिर करण्यात आली आहे. मोरे यांनी राज्य परिवहन महामंडळाच्या सेवेतून निवृत्त झाल्यानंतर सामाजिक कार्याला झोकून दिले आहे. तळागाळातील गोरगरीबांच्या विविध समस्या ते प्रशासनाशी स्वत: संपर्क साधून सोडवित असल्याने ते सर्वसामान्यांमध्ये लोकप्रिय ठरले आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

एस. टी. महामंडळाच्या सेवेतून ते निवृत्त झाले असले तरी ते आजही आजी-माजी सेवानिवृत्त एस. टी. कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागच्या व समस्या सोडविण्यासाठी कार्यरत आहेत. वेळप्रसंगी ते उपोषणाचा मार्ग अवलंबून एस.टी कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देत आहेत. उपोषणाच्या माध्यमातूनच त्यांनी एस. टी. निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी वर्षभर मोफत पास मिळवून देण्यात मोलाची कामगिरी बजावली आहे.

टाइम्स स्पेशल

आपल्या गावांतील आणि आजूबाजूच्या परिसरातील सुशिक्षित तरुण-तरुणींना नोकरी मिळविण्याच्या उद्देशानेही ते मार्गदर्शन करीत आहेत. अशा या चौफेर जिज्ञासु वृत्तीच्या व जनतेच्या समस्या जाणणाऱ्या चंद्रकांत लक्ष्मणराव मोरे यांना इंदिरा काँग्रेसने उमेदवारी देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे. त्यामुळे तिसंगी पंचायत समिती गणातून ते विक्रमी मतांनी विजयी होतील असे बोलले जात आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg