loader
Breaking News
Breaking News
Foto

माफ करा पाव्हणं… पण तुमच्या गावात मुलगी नाही देऊ शकत… पुण्यात बिबट्याचा टेरर

पुणे जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये बिबट्याच्या दहशतीमुळे एक गंभीर सामाजिक संकट उभे राहिले आहे. बिबट्याच्या वाढत्या हल्ल्यांमुळे मुलींचे पालक या भागातील मुलांशी मुलींचे लग्न करण्यास नकार देत आहेत. यामुळे अनेक सुशिक्षित तरुणांचे विवाह रखडले असून, त्यांना वधू मिळत नाहीत. बिबट्याची ही भीती आता केवळ जीवघेणी राहिलेली नसून, ती एक मोठी सामाजिक समस्या बनली आहे माणसांच्या रक्ताला चटावलेला बिबट्या हा लग्नातही मोठा अडथळा ठरत आहे. बिबट्याच्या दहशतीखाली वावरत असलेल्या शिरूर तालुक्यामधील गावांत एकाही मुलाची सोयरिक जमेनाशी झाली आहे. लग्नासाठी मुली न मिळाल्याने गावांतील अनेक तरुणांची स्वप्नं अधांतरी लटकलीत. फक्त बिबट्याच्या भीतीमुळे कोणतेच पालक या गावात आपल्या मुली द्यायला धजावत नाहीयेत. त्यामुळे अनेकांची लग्न रखडली आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सध्या राज्यातील विविध शहरांत, गावांगावात बिबट्याचे दर्शन होत असून अनेक लोकांचे जीवही जात आहेत. पुणे जिल्ह्यातील अनेक गावांतील गावकऱ्यांचे जगणे मुश्किल केले आहे. अगदी आंबेगाव, शिरूर, जुन्नर, खेड या तालुक्यांत खूप भयावह परिस्थिती आहे. लोकांच्या, जनावरांच्या रक्ताला चटावलेला बिबट्या कधी भरवस्तीत घुसून तर कधी लोकांना पकडून, कधी गोठयातील गुरांचं नरडं पकडून त्यांना ठार मारून घेऊन जातोय . त्यामुळे इथले गावकरी अगदी दहशताखाली जगतात, जीव मुठीत धरून जगायची वेळ त्यांच्यावर आली आहे. दिवसाढवळ्या बिबट्याचे दर्शन होत असल्याने शेतात काम करताना बिबट्यापासून संरक्षण करण्यासाठी उपाययोजना गावकरी करत आहेत.

टाइम्स स्पेशल

याच गावात अनेक तरूण मुलं असून त्यांची लग्न अद्याप झालेली नाहीत. लग्नासाठी मुली तर पहायला ते तयार आहेत. पण ते वेल सेटल्ड असूनही त्यांना लग्नासाठी होकार मिळत नाहीये. गावात आणि आसपासच्या भागात बिबट्याची दहशत असल्यामुळे कोणतेच पालक या गावांमधील तरूणांशी आपल्या मुलीचं नातं जोडण्यास तयार नाहीत. मुलीही या गावांत येण्यास आणि जीव धोक्यात टाकण्यास नकार देत आहे. लग्नासाठी मुली न मिळाल्याने गावांतील अनेक तरुणांची स्वप्नं अधांतरी लटकलीत. बिबट्यांच्या भीतीपोटी पालकच सोयरिक नाकारतायत, आणि त्यामुळे अनेक तरुण सेटल असूनही त्यांचे विवाह रखडलेत. बिबट्यांच्या धाकानं गावोगाव आता जीवसृष्टीसह सामाजिक आयुष्यही हादरलं आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg