loader
Breaking News
Breaking News
Foto

कलंबिस्त गावातील अडीचशे शिवसैनिकांचा आम. दीपक केसरकर यांच्या नेतृत्वावर विश्वास

​सावंतवाडी: कलंबिस्त गावात एकाच धडाक्यात मोठे राजकीय वळण घेतले! गावच्या सरपंच सपना सावंत यांनी पक्षातील कार्यकर्त्यांना व विश्वासू गावकऱ्यांना कोणतीही कल्पना न देता थेट भाजपमध्ये प्रवेश केल्याने संतापलेल्या शिवसैनिकांनी थेट सरपंचांनाच त्यांच्या गावात जोरदार धक्का दिला आहे. ​शिवसेनेचा झेंडा सोडून भाजपमध्ये गेलेल्या सरपंचांच्या या निर्णयानंतर गावात असंतोषाचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर संतप्त झालेल्या सुमारे अडीचशे शिवसैनिकांनी एकजुटीने आमदार दीपक केसरकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शिंदे गटाच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. या प्रवेशामुळे राजकीय गोटात खळबळ उडाली आहे. ​कार्यकर्त्यांनी यावेळी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “सपना सावंत यांना आम्ही जीवाचं रान करून सरपंच बनवलं, पण आम्हालाच विश्वासात न घेता त्यांनी पक्ष बदलला. आमचं श्रम, आमचं योगदान दुर्लक्षित झालं. त्यामुळे आज आम्ही एकदिलाने आमदार दीपक केसरकर यांच्या पाठीशी उभे राहतोय.”

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या प्रवेश सोहळ्यावेळी आमदार दीपक केसरकर यांनी गावकऱ्यांचे आभार मानत सांगितले, “कलंबिस्त गावानं नेहमीच आपलं प्रेम दिलं आहे. हे प्रेम मी कधी विसरणार नाही. गावातील रस्ते, पाणी, स्मशानभूमी यांसारखी प्रलंबित कामे तात्काळ पूर्ण केली जातील. महिलांच्या हातांना रोजगार देण्यासाठी ठोस पावलं उचलू.”​ संजू परब यांचे आवाहन: 'धनुष्यबाणाला विजय मिळवून द्या' ​जिल्हाप्रमुख संजू परब यांनी गावकऱ्यांना एकत्र राहण्याचे आवाहन करत सांगितले, “आमदार केसरकर हे कार्यसम्राट आहेत. त्यांनी कधीच पक्षभेद न ठेवता विकास केला. त्यामुळेच ते सलग चार वेळा आमदार झाले. सावंतवाडी मतदारसंघाचा विकास ज्या गतीने झाला, ती गती संपूर्ण सिंधुदुर्गात कुठेच दिसत नाही.”

टाइम्स स्पेशल

​पुढे ते म्हणाले, “आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत गावाने पुन्हा एकदिलाने धनुष्यबाणाला विजय मिळवून द्यावा. आम्ही तुमच्या प्रत्येक गरजेच्या वेळी सोबत आहोत.” ​यावेळी तालुकाप्रमुख दिनेश गावडे, विधानसभा प्रमुख प्रेमानंद देसाई, प्ररिक्षित मांजरेकर, विनोद सावंत, जीवन लाड, सौ लाड, गावातील मानकरी रमेश सावंत, अनिल देवकरी, अनिल सावंत, भास्कर सावंत, शाहू पासते, पालकर यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg