loader
Breaking News
Breaking News
Foto

मालवण शहरातील रस्त्यांवरील खड्डे तात्काळ बुजवावेत- शिल्पा खोत यांची मागणी

मालवण (प्रतिनिधी) - मालवण शहरातील प्रमुख रस्त्यांची अनेक ठिकाणी खड्ड्यांमुळे चाळण झाली आहे. वाहन चालक, नागरिकांना खड्डेमय रस्त्यांमुळे त्रासाला सामोरे लागत आहे. रस्त्यावरील खड्डे डांबरीकरण करून तात्काळ बुजवण्यात यावेत, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या शिल्पा यतीन खोत यांनी सार्वजनिक बांधकाम उपविभाग मालवण यांच्याकडे केली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मालवण शहरातील स्वामी हॉटेल, सरस्वती टॉकीज, लिमिये हॉस्पिटल , बस स्थानक ते देऊळवाडा मार्गावर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. पर्यटनाची राजधानी ओळख असलेल्या मालवण शहरातील या रस्त्यांची अवस्था पर्यटनावर परिणाम करणारी तसेच वाहन चालक व स्थानिक नागरिकांना त्रासदायक ठरत आहे. अपघातही घडत आहेत. तात्काळ डांबरीकरण करून रस्ता सुस्थितीत करावा. अन्यथा मालवण वासीयांकडून आंदोलनाचा मार्गाचा अवलंब केल्यास त्याला सर्वस्वी विभाग जबाबदार असेल. तरी याची तात्काळ कार्यवाही व्हावी, असे सौ. शिल्पा खोत यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg