loader
Breaking News
Breaking News
Foto

कुंभार्ली घाट रस्त्याची दुरवस्था, प्रशासनाचे दुरुस्तीकडे दुर्लक्ष; वाहन चालकांची कसरत

संगलट खेड (प्रतिनिधी) - गुहागर-विजापूर राष्ट्रीय महामार्गावरील कुंभार्ली घाटरस्त्यांची दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर जागोजागी पडलेल्या खड्ड्यांमुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहेत. अवजड वाहतुकीची वाहने कधी घाटातील रस्त्यावर कोसळत आहेत, तर कधी दरीत कोसळत आहेत. त्यानंतरही सार्वजनिक बांधकाम विभाग खड्डे भरण्याकडे दुर्लक्ष करत आहे. कुंभार्ली घाटातून रत्नागिरी जिल्ह्यात लागणारा जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा केला जातो. कर्नाटकातील बेळगाव, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात जाणारी एसटीची वाहतूक याच घाटातून होते. येथील शासकीय कार्यालयात कार्यरत असलेले अनेक कर्मचारी, अधिकारी याच घाटमार्गे जिल्ह्यात येतात. खेड, चिपळूण तालुक्यातील औद्योगिक वसाहतीमधून तयार होणारे उत्पादन या घाटमार्गे पश्चिम महाराष्ट्रात पाठवले जाते. सध्या आंबाघाटाचे काम सुरू आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

त्यामुळे मागील वर्षापासून बेळगाव आणि पश्चिम महाराष्ट्रात जाणारी बहुतांशी अवजड मालाची वाहने या घाटमार्गे जात आहेत. पावसाळ्यात घाट रस्त्याची दुरुस्ती झाली नाही, त्यामुळे पावसाचे चार महिने त्रासाचे गेले. त्यानंतरही घाट रस्त्याच्या दुरुस्तीला बांधकाम विभागाला वेळ मिळत नाही. गेल्या आठवड्यात सिमेंटची वाहतूक करणार्‍या ट्रक दरीत कोसळला. घाटातील प्रचंड मोठ्या खड्ड्यात आदळून किराणामालाची वाहतूक करणारा ट्रक उलटला. हा ट्रक बाजूला करताना वाहतूक कोंडी झाली. त्यानंतर मोटारवाहन संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोक पवार यांनी बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांना फोन करून तातडीने रस्ता दुरुस्त करण्याची मागणी केली.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg