loader
Breaking News
Breaking News
Foto

कामगारांना न्याय देण्यासाठी मिरजोळे ग्रामस्थांची एमआयडीसीतील कंपनीवर धडक

रत्नागिरी (वार्ताहर) - मिरजोळे गावातील स्थानिक नागरिकांचे प्रश्‍न, पाण्याचे प्रश्‍न, वीजेचे प्रश्‍न, नोकरीचे प्रश्‍न अशा अनेक समस्यांच्या उपायांसाठी मिरजोळे ग्रामस्थ नेहमीच एकत्र येतात. आपल्या एकजुटीने गावातील प्रश्‍न तडीस नेऊन पोहचवितात. कोणावरही अन्याय होऊ नये, ही भूमिका नेहमी मिरजोळे ग्रामस्थांची असून पण आपल्यावरही होणारा अन्याय खपवून घेतला जात नाही. याच भूमिकेतून दोन दिवसांपूर्वी एमआयडीसीतील कंपनीवर ग्रामस्थांनी धडक दिली. वातावरण तंग झाले. कोणतीही मध्यस्थी न स्विकारता स्थानिक कामगारांना न्याय देण्यासाठी प्रशासनाला थार्‍यावर आणण्याचे काम इथल्या तरुण तडफदार असे उद्योजक वैभव पाटील, सरपंच रत्नदिप पाटील आणि युवा नेते हर्षराज पाटील यांच्यासह ग्रामस्थांनी केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

औद्योगिक परिसर मिरजोळे येथील ऑक्टेल कंपनीने काही स्थानिक कामगारांवर अन्याय केल्याचे समजल्यानंतर मिरजोळे ग्रामस्थांनी कंपनीवर धडक दिली. त्यामुळे प्रशासन खडबडून जागे झाले. कामगारांवर अन्याय करु नका, कामगारांना कायम करा, कामगारांच्या कुटुंबियांची उपासमारी आणू नका, हे स्थानिक कामगार आहेत त्यांच्यावर आम्ही अन्याय होऊ देणार नाही, असे सांगत उद्योजक वैभव पाटील, सरपंच रत्नदिप पाटील, युवा नेते हर्षराज पाटील, डॉ.अभिजीत पाटील, तंटामुक्त अध्यक्ष शुभानंद पाटील, माजी सरपंच गजानन गुरव, किशोर जोशी, बावा पाटील, संदेश वाडकर, सुनिल कळंबटे, मंगेश जोशी, सुभाष कळंबटे, दिनेश जोशी व ग्रामस्थ यांनी कंपनीवर धडक दिली. कंपनीतील संबंधित अधिकार्‍यांना जाब विचारत कामगारांना कंपनीत कायम करुनच हे ग्रामस्थ परतले. कामगारांना न्याय मिळण्यासाठी त्यांच्या अटी व्यवस्थापनासमोर मांडल्या आणि आश्‍वासन घेऊनच ग्रामस्थ मिरजोळेत परतले.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg