loader
Breaking News
Breaking News
Foto

वरंधा घाटात दुचाकीचा भीषण अपघात; तरुणाचा जागीच मृत्यू

संगलट (खेड )(इक्बाल जमादार) - महाडहून पुण्याकडे जाणाऱ्या वरंधा घाटात आज पहाटे भीषण अपघात झाला. अवघड वळणावर दुचाकीवरील ताबा सुटल्याने झालेल्या या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महाड-पुणे मार्गावर वरंधा घाटात एमएच. ४६ आर १३१० या क्रमांकाच्या हिरो होंडा पॅशन मोटरसायकलचा अपघात झाला. या घटनेत शिवाजी दाजी ढेरे (रा. शेळींब, ता. भोर, जि. पुणे) या दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. घाटातील तीव्र वळण आणि घसरडी सडक यामुळे हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

वरंधा घाटातील ही जागा अत्यंत धोकादायक मानली जाते. या ठिकाणी वारंवार अपघात घडत असल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या घटनेचा अधिक तपास महाड एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पथक करीत आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg