loader
Breaking News
Breaking News
Foto

बांद्यात गोवा बनावट दारूसह 12 लाखांचा मुद्देमाल जप्त

बांदा : (प्रतिनिधी) - स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने बांदा पोलिस ठाणे हद्दीत मोठी कारवाई करत सुमारे १२ लाख ११ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई हॉटेल कावेरी, बांदा येथे पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. पोलिसांनी आकाश नामदेव खोत (२५, रा. सलगरे, जि. सांगली) आणि विठ्ठल पांडुरंग नाईक (४८, रा. विश्रामबाग, जि. सांगली) या दोघांना अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून १० लाख रुपये किमतीची कार आणि २ लाख ११ हजार २०० रुपयांची गोवा बनावटीची दारू असा एकूण १२.११ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

ही कारवाई सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षक मोहन दहिकर व अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या नेतृत्वात करण्यात आली. या कारवाईत सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुरेश राठोड, पोलीस अंमलदार अमर कांडर आणि महेश्वर समजिसकर यांनी सहभाग घेतला. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg