loader
Breaking News
Breaking News
Foto

गुहागर नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज

वेळणेश्वर (उमेश शिंदे) - गुहागर नगरपंचायतीच्या 17 प्रभागाची व एक जनतेतून थेट नगराध्यक्ष निवडीसाठीचे सार्वत्रिक निवडणूक पार पाडण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार परीक्षित पाटील यांनी आयोजित पत्रकार परिषदेतून दिली. गुहागर नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम माहिती देताना 10 नोव्हेंबर ते 17 नोव्हेंबर या कालावधीमध्ये इच्छुक उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल करावयाचे आहे. यामध्ये 16 तारखेला रविवार येत असून त्यादवशी नामनिर्देशन पत्र घेतले जाणार नाहीत. सकाळी 11 ते दुपारी 03 या वेळेमध्ये अर्ज स्वीकारले जातील. उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन भरून त्याची प्रत निवडणूक निर्णय विभागाकडे सादर करावयाची आहे. 18 नोव्हेंबर रोजी छाननी व सायंकाळी प्रसिद्धी दिली जाणार आहे. 19 नोव्हेंबर ते 21 नोव्हेंबर हा कालावधी नामनिर्देशन पत्र मागे घेण्याचा असून 21 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 3 वाजेपर्यंत उमेदवारांना आपले नामनिर्देशन पत्र मागे घेता येईल. छाननीत ज्यांचे अपील असतील त्यांना दिनांक 21 नोव्हेंबर ते २५ नोव्हेंबर या कालावधीमध्ये आपले नामनर्देशन पत्र मागे घेता येतील. 26 नोव्हेंबर रोजी निवडणूक चिन्ह देऊन अंतिम चिन्हांचे वाटप केले जाणार आहे. आवश्यकता भासल्यास 02 डिसेंबर 2025 रोजी मतदान तर 3 डिसेंबर 2025 रोजी निकाल जाहीर केला जाणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

गुहागर नगरपंचायतीमधील एकूण 17 प्रभागांमध्ये नगरसेवक निवडले जाणार असून नगराध्यक्ष थेट जनतेमधून निवडला जाणार आहे गुहागर नगरपंचायतीचे एकूण मतदार संख्या पुरुष 2856, तर स्त्री 3105 असून एकूण 5961 मतदार संख्या आहे. स एकूण 17 मतदान केंद्र उभारणार. प्रत्येक केंद्रावर 1 केंद्राध्यक्ष, 3 मतदान अधिकारी आणि 1 चतुर्थी श्रेणी कर्मचारी असे एकूण 5 कर्मचारी नियुक्त असून एकूण 250 कर्मचाऱ्यांची या निवडणूक प्रक्रिया करता निवड करण्यात आली आहे. 30 नोव्हेंबर रोजी रात्री 10 वाजेपर्यंत प्रचाराची जाहीर सभा मुदत देण्यात आली असून रात्री बारा वाजता प्रचार बंद करण्यात येणार आहे. यावेळी सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा मुख्याधिकारी स्वप्निल चव्हाण, सहाय्यक निवडणूक अधिकारी स्नेहल मेहता या निवडणूक प्रक्रियेमध्ये सहकार्य करणार आहेत.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg