loader
Breaking News
Breaking News
Foto

अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी ६० हजार रुपयांची भरपाई द्यावी : मनसेची मागणी

बांदा (प्रतिनिधी) - सावंतवाडी तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी किमान ६० हजार रुपये इतकी नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष मिलिंद सावंत यांनी कृषी अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष सुधीर राऊळ, तालुका उपाध्यक्ष सुनील आचरेकर, विभाग अध्यक्ष राकेश परब, इन्सुली शाखा अध्यक्ष दिनेश, भाई देसाई आदी उपस्थित होते. निवेदनात म्हटले आहे की, अवकाळी पावसामुळे तालुक्यातील अनेक भागांमध्ये नाचणी, भातपीक, भाजीपाला यांसारखी पिके पूर्णपणे नष्ट झाली आहेत. शेतकऱ्यांच्या कष्टाचे ओझे या पावसाने वाहून नेले असून शेतकरी वर्ग गंभीर आर्थिक संकटात सापडला आहे. सध्या प्रशासन पंचनामे करत असले तरी नुकसानग्रस्तांना मदत मिळण्यास विलंब होत आहे. सरकारकडून हेक्टरी फक्त ८ हजार रुपयांची तुटपुंजी मदत जाहीर करण्यात आली आहे, जी प्रत्यक्ष नुकसानीच्या तुलनेत अत्यंत अपुरी असल्याचे सावंत यांनी नमूद केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

गोवा राज्यात शेतकऱ्यांना हेक्टरी ४० हजार रुपयांची नुकसान भरपाई दिली जात असल्याचे उदाहरण देत सावंत यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याचे म्हटले आहे. “दोन्ही राज्यांत एकाच पक्षाचे सरकार असूनही महाराष्ट्रातील शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष का?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी शेतकऱ्यांना दिलेल्या मदतीचा संदर्भ देत, सध्याचे सरकार मात्र औपचारिक आश्वासनांपुरतेच मर्यादित राहिले असल्याची टीका मनसेतर्फे करण्यात आली आहे. मनसेने आपल्या निवेदनात प्रशासनाला पंचनामे तत्काळ पूर्ण करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत वितरित करण्याची मागणी केली आहे. शेतकऱ्यांच्या जीवनावश्यक प्रश्नावर सरकारने त्वरीत आणि न्याय्य निर्णय घ्यावा, अशी विनंती सावंत यांनी केली आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg