loader
Breaking News
Breaking News
Foto

रणधुमाळी सुरु! नगरपरिषद निवडणुकीसाठी पहिल्या दिवशी 664 उमेदवारांचे अर्ज दाखल

मुंबई :स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींची औपचारिक रणधुमाळी सुरू झाली आहे. नगरपरिषद व नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी कालपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी तब्बल 664 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहे.राज्यात एकूण 246 नगरपरिषद आणि 42 नगरपंचायतींमध्ये सदस्यपदांसाठी तसेच थेट अध्यक्षपदांच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया कालपासून अधिकृतपणे सुरू झाली आहे. यासह ग्रामीण व शहरी भागांतील उमेदवार अर्ज दाखल करणे सुरू केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

राजकीय पक्षांनी आपल्या उमेदवारांच्या याद्या निश्चित करण्यास गती दिली असून, अनेक ठिकाणी इच्छुकांच्या गर्दीमुळे निवडणूक कार्यालयांबाहेर मोठी लगबग पाहायला मिळाली. स्वतंत्र उमेदवारांनीही मोठ्या संख्येने अर्ज दाखल करत निवडणुकीत रंगत वाढली आहे.राज्यातील 246 नगरपरिषदा व 42 नगरपंचायर्तीच्या (एकूण 288) सदस्यपदासाठी आणि थेट अध्यक्षपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता 2 डिसेंबर 2025 रोजी मतदान. तर 3 डिसेंबर 2025 रोजी मतमोजणी होणार असल्याने या सर्व नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या कार्यक्षेत्रात आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg