loader
Breaking News
Breaking News
Foto

कोकणात शेतीमध्ये क्रांती होण्यासाठी तरुणांचा सहभाग महत्वाचा- कृषिभूषण, डॉ. तानाजीराव चोरगे

दापोली (प्रतिनिधी) - कोकणात शेतीमध्ये जोपर्यंत तरुण पिढी वळत नाही तोपर्यंत शेतीमध्ये क्रांती होणे शक्य नाही असे प्रतिपादन रत्नागिरी जिल्हा बँकेचे अध्यक्ष कृषिभूषण डॉ. तानाजीराव चोरगे यांनी कृषि मंडळनिहाय शेतकरी मेळाव्याच्या शुभारंभ कार्यक्रमामध्ये केले. कृषि मंडळ निहाय शेतकरी मेळाव्याचा शुभारंभ कार्यक्रम डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाच्या सर विश्वेश्वरैय्या सभागृहामध्ये मंगळवारी ११ नोव्हेंबर २०२५ रोजी आयोजित करण्यात आला होता. सदर कार्यक्रमाला जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री. शिवकुमार सदाफुले , प्रकल्प संचालक, आत्मा बेट्टीवार, विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. मकरंद जोशी, संशोधन संचालक, डॉ. प्रशांत शहारे , शिक्षण संचालक डॉ. सतिश नारखेडे , संदिप राजपूरे , सुनील दळवी आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अर्थसहाव्याने खरेदी करण्यात आलेल्या फिरते कृषि चिकित्सालय वाहनाचे उ‌द्घाटन डॉ. तानाजीराव चोरगे व कुलगरु डॉ. संजय भावे यांच्याहस्ते करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

आपल्या अध्यक्षीय मार्गदर्शनात मेळाव्याचे महत्व विषद करताना कुलगरु डॉ. संजय भावे म्हणाले की, कोकणामधील शेती पध्दती ही गावागावानुसार बदलत असल्याकारणाने तेथील शेतकऱ्यांच्या समस्यादेखील वेगवेगळ्या आहेत. याकरीताच प्रत्येक मंडळातील शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी व त्यांना योग्य ते मार्गदर्शन मिळावे यासाठी या मेळाव्यांचे आयोजन करण्यात येत असल्याचे सांगितले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये विस्तार शिक्षण विभाग प्रमुख डॉ. संतोष वरवडेकर यांनी मंडळनिहाय घेण्यात येणाऱ्या शेतकरी मेळावे व कृषि प्रदर्शनाबाबत विस्तृत माहिती दिली. या कार्यक्रमास कार्यकारी परिषदेचे सदस्य संदीप राजपुरे यांनी पीक विमा योजनेबाबत शेतकऱ्यांच्या असलेल्या समस्या मांडून बँकेमार्फत मिळणारा पीक विमा वाढवून मिळावा अशी मागणी केली.

टाइम्स स्पेशल

यावेळी विद्यापीठातील सर्व महाविद्यालयांचे सहयोगी अधिष्ठाता, विभागप्रमुख व शास्त्रज्ञ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या प्रशिक्षण साहित्यांचे तसेच डॉ. प्रफुल्ल आहिरे दिग्दर्शित केलेली गाणी चलतचित्रफितींचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg