loader
Breaking News
Breaking News
Foto

दापोली जालगाव येथील रचित पटेल राज्यस्तरीय आदर्श युवा खेळाडू पुरस्काराने सन्मानित

संगलट( खेड) (इक्बाल जमादार) - नवी मुंबईच्या जुईनगर, सानपाडा येथे आयोजित राज्यस्तरीय दुसरे कवी संमेलन व सन्मान सोहळ्यात दापोली, जालगाव येथील रहिवासी रचित योगेश पटेल यांना राज्यस्तरीय आदर्श युवा खेळाडू 2025 हा पुरस्कार जाहीर करण्यात आला, असे मुख्य संपादक तुषार नेवरेकर यांनी सांगितले. महाराष्ट्र राज्यातील अग्रगण्य संस्था दिशा महाराष्ट्रा यांच्या या कार्यक्रमात, नवी मुंबई स्ट्रायकर संघाचे रत्नागिरी जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणारे दापोलीतील हिंदुराज गोविंदा पथक एकमेव सहभागी पथक असून, रचित पटेल हा या युवा खेळाडूंपैकी सहभागी होता. खेळातील यशरचित पटेल यांनी कॉलेज जीवनात थ्रो-बॉल संघाचे प्रतिनिधित्व करताना राज्यस्तरीय ख्याती मिळवली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

तसेच प्रो गोविंदा, थ्रो-बॉल, कबड्डी, क्रिकेट आणि स्विमिंग या खेळांमध्ये त्यांनी प्राविण्य मिळविले आहे. शालेय तसेच कॉलेज जीवनापासूनच कबड्डी खेळताना, रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशन च्या स्पर्धेत दापोली संघातून राजापूर येथील पुरुष गटात अजिंक्यपद मिळविण्यात यश आले. कबड्डी व क्रिकेट स्पर्धांचे आयोजन, युवा खेळाडूंना प्रोत्साहित करणे, मंडळातील तरुण खेळाडूंचे प्रशिक्षण घेणे, सराव शिबिर आयोजित करणे आणि इतर मंडळांच्या स्पर्धांमध्ये सक्रिय सहभाग घेणे – अशा अनेक गुणांनी परिपक्व असलेल्या रचित पटेल यांना हा राज्यस्तरीय आदर्श युवा खेळाडू पुरस्कार जाहीर झाल्यामुळे संपूर्ण जिल्ह्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

टाइम्स स्पेशल

उल्लेखनीय कामगिरी महाराष्ट्र कॅडेट कॉर्प्स (MCC) 2015 – बेस्ट कॅडेट अवॉर्डदापोली प्रो कबड्डी लीग 2024 – अंतिम विजयी संघातील महत्वाचा खेळाडू लाडघर कबड्डी प्रिमिअर लीग 2022 व 2023 – अंतिम विजयी संघातील खेळाडू देवरुख (संगमेश्वर) जिल्हास्तरीय कबड्डी प्रिमिअर लीग – उत्तम कामगिरी दापोली प्रो गोविंदा 2023 पर्व 1 – अंतिम विजयी संघाचा खेळाडू दापोली प्रो गोविंदा 2024 पर्व 2 – उपविजेता संघाचा खेळाडूदापोली प्रो गोविंदा 2025 पर्व 2 – उपविजेता संघाचा खेळाडू खेड प्रो गोविंदा 2024 पर्व 1 – तृतीय क्रमांक मिळविलेल्या संघाचा खेळाडू

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg