loader
Breaking News
Breaking News
Foto

रत्नागिरीतील ‘त्या’ प्रभागात अल्पसंख्यांक मोर्चाला तिकीटे द्या : अब्दुल बिजली खान

रत्नागिरी नगरपालिका निवडणुकीत रत्नागिरी शहरातील मुस्लिम बहुल असलेल्या ६ प्रभागातील जागा भाजपा अल्पसंख्यांक मोर्चासाठी देण्यात याव्यात अशी मागणी भाजपचे अल्पसंख्यांक मोर्चा दक्षिण रत्नागिरीचे जिल्हाध्यक्ष श्री. अब्दुल बिजली खान यांनी केली आहे. नगरपालिका व नगरपंचायती निवडणुका आता जवळ आल्याने आपल्या उमेदवारांना तिकीट मिळावे यासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरु झाली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

रत्नागिरी शहरातील मुस्लिम बहुल असे ६ प्रभाग आहेत. हे ६ प्रभाग म्हणजे मिरकरवाडा प्रभाग क्र. १३, राजीवडा प्रभाग क्र. १५, राजीवडा प्रभाग क्र. १६, प्रभाग क्र. ८ व कोकण नगर प्रभाग क्र. ४ हे प्रभाग मुस्लिम बहुल आहेत. त्यामुळे या ६ प्रभागांमध्ये भाजपच्या अल्पसंख्यांक मोर्चाचे कार्यकर्त्यांना अग्रक्रमाने तिकीटे मिळावीत अशी मागणी भाजपचे अल्पसंख्यांक मोर्चा दक्षिण रत्नागिरीचे जिल्हाध्यक्ष श्री. अब्दुल बिजली खान यांनी केली आहे.त्यांनी सांगितले की, ‘‘रत्नागिरीतील अल्पसंख्यांक हे सदैव देशप्रेमी व राष्ट्रवादी विचारसरणीचे म्हणून ओळखले जातात. त्यांचे राष्ट्रप्रेम व तळमळ ध्यानी घेऊन भाजप अल्पसंख्यांक मोर्चाच्या कार्यकर्त्यांना या ६ प्रभागांमध्ये उमेदवारी देण्यात आली तर ती त्यांच्या कार्याची पोचपावती ठरेल’’.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg