loader
Breaking News
Breaking News
Foto

मुरुगवाडा शिवलकरवाडीत इतिहासाची आठवण करुन देणारा साकारला भव्य किल्ला... पावनखिंड-विशालगड-पन्हाळगड

रत्नागिरी- रत्नागिरी मुरुगवाडा शिवलकरवाडीत इतिहासाची आठवण करुन देणारा भव्य किल्ला साकारण्यात आला. छत्रपती शिवरायांनी मोघलांना पराभूत करताना कशी धूळ चारली त्या पावनखिंडीचा इतिहास आजच्या पिढीला कळावा म्हणून इथल्या तरुणांनी साकारला. असंख्य शिवप्रेमी नागरिकांनी या जाज्वल्य इतिहासाला पाहून धन्य ते शिवराय असेच म्हटले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दिवाळी सुरु झाली की पहिल आठवत ते म्हणजे सर्व मुलानी एकत्र येऊन किल्ला बनवायच. त्यासाठी दगड, माती ,वाळु गोळा करुन दिवस रात्र मेहनत करुन किल्ला बनवला आणि अवकाळी पावसाने सर्व मेहनती वर पाणी फेरायच ! किल्ल्‌यावर कागद बांधून ही वादळामुळे तो राहिला नाही. अतिशय संकट येऊन पण आम्ही हार न मानली नाही. कारण शिवरायांची शिकवण आहे. आम्ही एकजुटीने पावनखिंड : विशाळगड आणि पन्हाळगड हा किल्ला साकारला आहे. इ.स.२ मार्च १६६० रोजी सिद्दी जोहरने पन्हाळयास वेढा दिला होता. यावेळी छत्रपती शिवाजीराजे पन्हाळा किल्ल्‌यावर अडकून पडले होते. मुसळधार पावसात सुद्धा सिद्दी वेढा सोडावयास तयार नव्हता. या कठीण प्रसंगी महाराजांनी सिद्धीस तहाचा निरोप धाडला त्यामुळे सिद्धी गाफील राहिला. शिवा काशीद नावाच्या मावळ्याने छत्रपतींच्या वेशात सिद्दी जौहर यास तहाची बोलणी करण्यात गुंतवून छत्रपतींना पन्हाळ्याहून निसटण्यास पुरेसा अवधी दिला.

टाइम्स स्पेशल

१३ जुलै, १६६० रोजी पन्हाळगडाला पडलेल्या वेढ्यातून निसटून निघालेले शिवाजी महाराज विशाळगडाकडे जात असताना सिद्दी मसूदच्या सैन्याने त्यांना येथे गाठले. तेव्हा झालेल्या निकराच्या लढाईत बाजी प्रभू देशपांडे, त्यांचे भाऊ फुलाजी देशपांडे व त्यांच्यासह मोजक्या सैनिकांनी ही खिंड जबरी लढवली व आदिलशाही सैन्याला थोपवून धरले, यामुळे शिवाजी महाराजांना विशाळगड गाठणे शक्य झाले. अशाप्रकारे ही थीम आम्ही सादर केली आहे. यामध्ये यश चव्हाण, गौरव चव्हाण, हर्ष फोंडेकर, तेजस शिंदे, सिद्धेश शिंदे यांचे योगदान लाभले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg