loader
Breaking News
Breaking News
Foto

खेडमध्ये बिबट्याचा मृत्यू; अज्ञात वाहनाच्या धडकेचा संशय

खेड (दिलीप देवळेकर) : रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात आज सकाळी एक दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. खेड-बहिरवली मार्गावरील नांदगाव परिसरात रस्त्याच्या कडेला एक बिबट्या मृतावस्थेत आढळून आला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून स्थानिक नागरिकांमध्ये वन्यजीवांच्या सुरक्षिततेबाबत चिंता निर्माण झाली आहे. स्थानिक ग्रामस्थांनी हा मृत बिबट्या पाहताच वनविभागाला याची माहिती दिली. वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. प्राथमिक तपासानुसार, अज्ञात वाहनाने धडक दिल्याने या बिबट्याचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज वनविभागाने व्यक्त केला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

वनाधिकारी उमेश भागवत यांनी सांगितले की, “बिबट्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झालेली आहे. या गंभीर जखमेमुळे त्याचा जागीच मृत्यू झाला असावा. शवविच्छेदनानंतर नेमकं कारण स्पष्ट होईल." वनविभागाने मृत बिबट्याचा मृतदेह सुरक्षितरीत्या ताब्यात घेतला असून, आवश्यक तपास व अहवालाची प्रक्रिया सुरू आहे. अज्ञात वाहन चालकाविरोधात वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. वाहनचालकाने अपघातानंतर घटनास्थळावर थांबण्याऐवजी पलायन केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे सीसीटीव्ही फुटेज आणि स्थानिक साक्षीदारांच्या मदतीने आरोपीचा शोध घेतला जात आहे.

टाइम्स स्पेशल

वाहनाच्या धडकेत बिबट्या मृत्यू झाला आहे असे pm रिपोर्ट मधून समजले आहे आणि वनविभागाच्या वतीने त्याला दफन करण्यात आले आहे. अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दखल करण्यात आला आहे अशी माहिती वनविभाग खेड कडून मिळाली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg