loader
Breaking News
Breaking News
Foto

दोडामार्ग मध्ये ठाकरे सेनेला दणका, महिला तालुका अध्यक्ष श्रेयाली गवस यांचा शिंदे गटात प्रवेश

दोडामार्ग (प्रतिनिधी) - सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवलीमध्ये दोन्ही शिवसेना एकञ लढणार अशी राजकीय हालचाली चर्चा सुरू झाल्या होत्या. दोडामार्ग तालुक्यातील एक जिल्हास्तरीय नेता शिवसेना पक्षात जाणार अशी चर्चा सुरू झाली असताना ठाकरे सेनेच्या दोडामार्ग तालुका महिला अध्यक्ष श्रेयाली गवस यांनी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या तोंडावर शिंदे शिवसेना पक्षात प्रवेश करुन ठाकरे सेनेला दणका दिला आहे. साटेली भेडशी जिल्हा परिषद मतदार संघात भाजपाच्या उमेदवार विरोधात श्रेयाली गवस यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

साटेली भेडशी मतदार संघातील रहिवासी असलेल्या श्रेयाली गवस गेली काही वर्षे ठाकरे शिवसेना महिला तालुका अध्यक्ष म्हणून काम करत होत्या. लोकसभा, विधानसभा, तसेच या अगोदर पार पडलेल्या स्थानिक निवडणुकीच्या दरम्यान पक्षाचा प्रचार केला होता. शिवसेना दोन भाग झाले यामुळे ठाकरे सेनेत काही मरगळ निर्माण झाली होती. ठाकरे सेनेच्या महिला तालुका अध्यक्ष श्रेयाली गवस यांना शिवसेना पक्षात प्रवेश करून घेऊन त्यांना साटेली भेडशी जिल्हा परिषद मतदारसंघ उमेदवार म्हणून उमेदवारी देण्यासाठी अखेर शिंदे शिवसेना पदाधिकारी यांना यश आले.

टाइम्स स्पेशल

साटेली भेडशी मतदार संघात पूर्वी माजी जिल्हा परिषद सभापती अनिषा शैलेश दळवी यांच्या नावाची चर्चा होती, पण त्यांनी नकार दिला. यामुळे महिला उमेदवार पाहिजे यासाठी अखेर श्रेयाली गवस यांना पक्षात प्रवेश घेणे ठरले यात यश मिळाले. सावंतवाडी येथे आमदार दिपक केसरकर यांच्या नेतृत्वाखाली हा प्रवेश झाला. निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे सेनेला दणका दिला आहे. यावेळी यावेळी जिल्हा प्रमुख संजू परब तालुका प्रमुख गणेश प्रसाद गवस, उप जिल्हाप्रमुख राजू निंबाळकर, उपजिल्हा प्रमुख शैलेश दळवी, तालुका संघटक गोपाळ गवस, उप तालुका प्रमुक दादा देसाई, भगवान गवस, रामदास मेस्त्री, बबलू पांगम, बाळा नाईक, विनायक शेट्ये, विशांत तळवडेकर, संजय गवस, सज्जन धाऊसकर आदि उपस्थीत होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg