loader
Breaking News
Breaking News
Foto

सांगलीत दुहेरी हत्याकांड, वाढदिवसाच्या पार्टीत धारदार शस्त्राने वार करुन दलित महासंघाच्या जिल्हाध्यक्षाची हत्या

सांगली - सांगलीत एक धक्कादायक घटना घडली आहे. मध्यरात्री गारपीर परिसरात झालेल्या हल्यात उत्तम मोहिते यांचा जागीच मृत्यू झाला आहे. अशी माहिती आहे की, उत्तम मोहितेवर शाब्या शाहरुख शेख यांनी जीवघेणा हल्ला केला. त्यानंतर उत्तमच्या पुतण्याने प्रत्युत्तरात शेखवर हल्ला केला असून यात शेखही ठार झाला आहे, अशी माहिती मिळत आहे. मोहिते आणि शेख यांच्यात जुना वाद होता. आणि यातूनच हा खूनी खेळ झाल्याचे बोलले जात आहे. पुलिस हे पुढील तपास करत आहेत. या प्रकरणात चार आरोपींचा सहभाग असल्याची शक्यता वर्तवली जात आहे, पोलिस हे घटनास्थळी दाखल झाले आहेत. परिसरात स्मशान शांतता पसरली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

उत्तम मोहिते हे दलित महासंघाचे जिल्हाध्यक्ष होते. त्यांचा काल म्हणजेच मंगळवारी वाढदिवस होता. त्यांच्या वाढदिवसावेळी हल्लेखोरांसोबत वाद झाला होता. यातच आरोपीनं उत्तम मोहिते यांच्यावर धारदार शस्त्राने वार केले. आणि ते रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. या घटनेनेंतर त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र, त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेने सांगली जिल्ह्यात तवाणपूर्ण शांततेचे वातावरण आहे. दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांनी रुग्णालय परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. आता सर्वत्र शांतता असून पोलिस पुढील तपास करत आहेत.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg