loader
Breaking News
Breaking News
Foto

आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी संशयित आरोपींना जामीन मंजूर

खेड (प्रतिनिधी) - दापोली तालुक्यातील राजवाडी येथील जयवंत भागोजी दुबळे या ८० वर्षीय वृद्धास गळफास घेऊन आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप असणाऱ्या संदेश शंकर कदम (वय - ४८, सध्या रा. जालगाव बर्वेवाडी, मूळ रा. हर्णै राजवाडी, ता. दापोली) व अमोल भालचंद्र गुरव (वय - ३९, रा. मोठी गोडीबाव मराठी, ता. दापोली) या दोघां संशयित आरोपींना खेड येथील जिल्हा न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. मयत जयवंत भागोजी दुबळे यांनी दि.३०/१०/२०२५ रोजी आपल्या राहत्या घरात गळफास घेवुन आत्महत्या केली असल्याने दापोली पोलीस ठाणे अ.मृ.रजि नं.७४/२०२५ बी.एन.एस.एस.१९४ प्रमाणे मयताचे नातू कौशिक संजय दुबळे वय-२५ वर्षे रा. राजवाडी ता.दापोली जि. रत्नागिरी यांनी दिलेल्या खबरीवरुन दाखल करण्यात आला आहे. या आकस्मिक मयताची चौकशी सुरु असताना मयताचा नातेवाईक यांना मयताचे घरात आत्महत्या करण्यापुर्वी स्वहस्ताक्षरातील लिहुन ठेवलेली चिट्ठी मिळुन आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यामध्ये मयताने जमिनीच्या व्यवहारातील मोबदल्याचे ४० लाख रुपये १) संदेश शंकर कदम, वय-४८ वर्षे, सध्या रा. जालगाव बर्वेवाडी मुळ रा.हर्णे राजवाडी ता. दापोली, जि. रत्नागिरी २) अमोल भालचंद्र गुरव, वय-३९ वर्षे, रा. मोठीगोडीबाव मराठी, ता. दापोली, जि. रत्नागिरी यांनी दिले नसल्याच्या कारणावरुन जीवन संपवित आहे, असे लिहले असल्याचे दिसुन येत आहे. तरी यातील आरोपी क्र १) संदेश शंकर कदम, वय-४८ वर्षे, सध्या रा. जालगाव बर्वेवाडी मुळ रा.हर्णे राजवाडी ता. दापोली, जि.रत्नागिरी २) अमोल भालचंद्र गुरव, वय-३९ वर्षे, रा. मोठीगोडीबाव मराठी, ता. दापोली, जि.रत्नागिरी यांनी मयत जयवंत भागोजी दुबळे वय-८० वर्षे यांना आत्महत्येस प्रवृत्त केले म्हणून फिर्यादी यांनी दिले फिर्यादीवरून हा गुन्हा रजि. दाखल करण्यात आलेला आहे.

टाइम्स स्पेशल

अटक संशयित आरोपी यांच्यावतीने ॲड. सुधीर शरद बुटाला यांनी युक्तिवाद केला. विविध न्यायालयाचे निवाडे दिले. सरकार पक्षाने पुन्हा हा गुन्हा गंभीर स्वरूपाचा व संवेदनशील आहे व आरोपीचे जामीन अर्जास आक्षेप घेतला व जामीन नामंजूर करण्याची विनंती केली. ॲड. सुधीर बुटाला यांनी, आत्महत्या करणेस आरोपी जबाबदार नाहीत व त्यांचे कृत्य हे आत्महत्येस प्रवृत्त करणारे नाही. असे निदर्शनास आणून दिले. ॲड. सुधीर बुटाला यांनी केलेला युक्तीवाद जिल्हा न्यायालयाने ग्राह्य धरून दोन्ही संशयित आरोपीची जामीनावर मुक्तता केली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg