loader
Breaking News
Breaking News
Foto

डॉ. श्रीनिवास रेड्डी प्रकरणी पाचवा आरोपी ताब्यात ;4 आरोपी पोलिसांच्या रडारवर

कणकवली (प्रतिनिधी)- कर्नाटक राज्यातील बेंगलोर येथील डॉ. श्रीनिवास रेड्डी यांच्या खूनाच्या गुन्ह्यातील पाचवा आरोपी वर्धन के. एन. (वय 20, रा. अनुर, ता. चिंतामणी, जि. चिख बल्लापूर, राज्य कर्नाटक) याला एलसीबी सिंधुदुर्गच्या पथकाने त्याच्या राहत्या घराजवळून कर्नाटक राज्यामधून ताब्यात घेतले आहे. दरम्यान बेंगलोर येथील डॉ. श्रीनिवास रेड्डी यांच्या खुनाच्या गुन्ह्यात एलसीबीने पकडलेल्या आरोपींची एकूण संख्या 5 झाली असून अद्याप 4 आरोपी पोलिसांच्या रडारवर आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर, अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम, एलसीबी पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबी पीएसआय अनिल हाडळ यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुरेश राठोड, अंमलदार अमर कांडर, पोलीस मुख्यालयातील चालक अंमलदार विक्रम पवार, अंमलदार मलकारसिद्द जमादार यांच्या पथकाने 5 नोव्हेंबर रोजी ही दमदार कामगिरी फत्ते केली. 6 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजता एलसीबी lच्या पथकाने आरोपी वर्धन के. एन. याला घेऊन कणकवली पोलीस ठाण्यात दाखल होत आरोपी वर्धन याला कणकवली पोलिसांच्या हवाली केले. 23 ऑक्टोबर रोजी कणकवली तालुक्यातील साळीस्ते गणपती साना येथे अज्ञात पुरुषाचा धारदार शस्त्राने भोसकलेल्या अवस्थेतील मृतदेह सापडला होता. हा मृतदेह बेंगळुर येथील डॉ. श्रीनिवास रेड्डी यांचा असल्याचे निष्पन्न झाले होते. 25 ऑक्टोबर पासून मागील 15 दिवस एलसीबी पीएसआय अनिल हाडळ यांच्या नेतृत्वाखालील पथक बेंगळुर मध्ये डॉ. रेड्डी यांच्या खुनाचा तपास करण्यासाठी ठाण मांडून होते. डॉ. रेड्डी खून प्रकरणी एलसीबी सिंधुदुर्गच्या पथकाला आरोपींना पकडण्यात यश आले असून उर्वरित चार आरोपीनाही लवकरच गजाआड केले जाण्याची शक्यता आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg