loader
Breaking News
Breaking News
Foto

गणेशगुळे येथे आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांच्या मूळ स्थानी शिलालेख अनावरण उत्साहात

गावखडी (वार्ताहर) - रत्नागिरी तालुक्यातील गणेशगुळे येथे आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांच्या घराण्याच्या मूळ स्थानी रविवार दिनांक 9 नोव्हेंबर 2025 रोजी प्रमुख पाहुणे मत्स्यव्यवसाय व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांच्या घराण्याच्या मूळ स्थानी शिलालेख अनावरण संध्याकाळी झाले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे माननीय नितेश राणे मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री, गणेश गुळे गावचे माजी सरपंच श्रावणी विक्रांत रांगणकर , प्रमुख वक्त्या पद्मजा अभ्यंकर सहकार्यवाहिका कोकण प्रांत , मीरा भिडे जिल्हा दक्षिण रत्नागिरी रेणुका प्रतिष्ठान रत्नागिरीचे अध्यक्षा दीपा पाटकर , कोकण प्रांत सहकार्यवाहीका उमा दांडेकर आणि ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थिती लाभली होती.

टाइम्स स्पेशल

हा कार्यक्रम अथर्व कोकोनट रिसॉर्ट गणेशगुळे, येथे मत्स्यव्यवसाय व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम रविवार दिनांक 9 नोव्हेंबर 2025 रोजी संध्याकाळी उपस्थितीत पार पडला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मीरा भिडे यांनी केले. प्रास्ताविक उमा दांडेकर यांनी केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg