loader
Breaking News
Breaking News
Foto

गुहागर राज्य मानांकन कॅरम; रत्नागिरीचा ओम पारकर चौथ्या फेरीत दाखल

रत्नागिरी - प्रदीप परचुरे आणि कॅरम लव्हर्स ग्रुप गुहागर यांच्यावतीने तसेच महाराष्ट्र कॅरम असोसिएशन व रत्नागिरी डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशनच्या मान्यतेने भंडारी भवन गुहागर, रत्नागिरी येथे सुरु असलेल्या राज्य मानांकन कॅरम स्पर्धेच्या पुरुष एकेरी गटाच्या चौथ्या फेरीत रत्नागिरीच्या ओम पारकरने ठाण्याच्या कुणाल राऊतवर तीन सेटपर्यंत रंगलेल्या लढतीत २०-१८, १६-१५ व २०-८ असा पराभव करत चौथी फेरी गाठली. तर रत्नागिरीच्याच योगेश कोंडविलकरने पुण्याच्या आयुष गरुडला सरळ दोन सेटमध्ये १६-६, १८-१० असे नमवून आगेकूच केली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

पुरुष एकेरी तिसर्‍या फेरीचे निकाल पुढीलप्रमाणे- झैद अहमद फारुकी (ठाणे) वि वि मंगेश कासारे (मुंबई) २५-४, २५-०, राजेश गोहिल (रायगड) वि वि सुरज कुंभार (मुंबई) १९-१४, २५-०, पंकज पवार (ठाणे) वि वि विजय पाटील (मुंबई उपनगर) २५-५, २५-०, हितेश कदम (मुंबई उपनगर) वि वि राहुल भस्मे (रत्नागिरी) २४-११, १३-२३, २५-१४, समीर अंसारी (ठाणे) वि वि सुदेश वाळके (मुंबई उपनगर) २५-६, २५-४, रियाझ अकबर अली (रत्नागिरी) वि वि विलास आंबवले (ठाणे) २५-०, २५-८, अमोल सावर्डेकर (मुंबई) वि वि हेमंत पांचाळ (मुंबई) २५-१५, १७-९, दिनेश केदार (मुंबई) वि वि ब्लेसिंग सामी (ठाणे) २५-३, २५-१, सागर वाघमारे (पुणे) वि वि सुजित जाधव (रत्नागिरी) २५-५, २५-१, ओमकार टिळक (मुंबई) वि वि अब्दुल हमीद (रायगड) २५-०, २५-०, रवींद्र हंगे (पुणे) वि वि आशिष सिंग (मुंबई उपनगर) १८-२०, २४-९, २५-१, विश्वजित भावे (ठाणे) वि वि जोनाथन बोनल (पालघर) २५-९, २५-९.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg