loader
Breaking News
Breaking News
Foto

उपयुक्त पशुचे मांस घेऊन जाणारा टेम्पो चंदगड पोलिसांनी पकडला, दोघांना घेतले ताब्यात

दोडामार्ग (प्रतिनिधी) - गोवा ते दोडामार्ग बेळगाव कोल्हापूर मार्गावर असलेल्या तिलारी घाटातून मोठ्या प्रमाणात उपयुक्त पशुचे मांस वाहतूक ही केली जाते. भाजीपाला, इतर मालवाहतूक नावाखाली उपयुक्त पशुचे मांस वाहतूक केली जाते. अशा प्रकारे उपयुक्त पशुचे मांस वाहतूक करणारा कर्नाटकमधील टेम्पो तिलारी नगर घाटमाथ्यावर बंद पडला आणि उपयुक्त पशुचे मांस वाहतूक प्रकरण उजेडात आले. काही जणांनी चंदगड पोलिसांना फोन करून माहिती दिली. या नंतर चंदगड पोलिसांनी उपयुक्त पशुचे मांस असणारा टेम्पो तसेच दोन जणांना ताब्यात घेतले. मांस वाहतूक करणारी कार जाळपोळ प्रकरण होऊन देखील तिलारी घाटातून विजघर पोलीस चेकपोस्ट येथून उपयुक्त पशुचे मांस गोवा राज्यात जाते हे पुन्हा उघड झाले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

काही महिन्यांपूर्वी तिलारी घाटात जयकर पॉईंट येथे एका टेम्पो मध्ये मोठ्या प्रमाणात उपयुक्त पशुचे मांस पोत्यात भरून वर भाताचा कुंडा भुसा पोथी टाकून वाहतूक करताना चंदगड पोलिसांनी जागरुक नागरीकांच्या मदतीने पकडला होता. बेळगाव येथून मोठ्या प्रमाणात उपयुक्त पशुचे मांस तिलारी घाटातून विजघर चेकपोस्ट येथून गोवा राज्यात नेले जात असताना विजघर चेकपोस्ट येथे वाहने तपासणी का केली जात नाही? नुकताच दारू भरलेला डंपर येथून निसटला होता. चंदगड पोलिसांनी उपयुक्त पशूचे मांस वाहतूक टेम्पो पकडला नसता तर तो देखील विजघर चेकपोस्ट येथून ठरल्या प्रमाणे सोडून दिला असता. विजघर चेकपोस्ट येथील पोलीस कर्मचारी कारवाई का करत नाही? याची चर्चा सुरू झाली आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg