loader
Breaking News
Breaking News
Foto

बळीराज सेना पक्षप्रमुख अशोक वालम यांचे गुहागर येथे जंगी स्वागत

आबलोली (संदेश कदम) - कोकणात मुसळधार पावसामुळे शेतीचे व आंबा, काजू पिकांचे नुकसान झाले आहे. याचा आढावा घेण्यासाठी व शेतकऱ्यांच्या नुकसानीची पहाणी करण्यासाठी बळीराज सेना पक्षप्रमुख, राष्ट्रीय अध्यक्ष अशोक (दादा) वालम हे गुहागर दौऱ्यावर आले असताना गुहागर शिवाजी चौक येथे बळीराज सेनेचे जिल्हाध्यक्ष पराग कांबळे यांनी पक्षप्रमुख अशोक (दादा) वालम यांचे भगवी शाल घालून व भूपे देऊन जंगी स्वागत केले तर बळीराज सेना महिला संघटना तालुका गुहागर या संघटनेच्या वतीने महिलांनी बळीराज सेनेचे पक्षप्रमुख, राष्ट्रीय अध्यक्ष अशोक (दादा) वालम यांचे पुष्पगुच्छ देऊन जंगी स्वागत केले. यावेळी अशोक (दादा) वालम यांच्या समवेत शामराव पेजे महामंडळाचे अध्यक्ष डॉ. प्रकाश भांगरथ,बळीराज सेनेचे जिल्हाध्यक्ष पराग कांबळे, उपाध्यक्ष सुरेश भायजे, चिटणीस संभाजी काजरेकर, विधानसभा संपर्कप्रमुख शरद बोबले, दक्षिण रत्नागिरी अध्यक्ष तानाजी कुळे, गुहागर तालुका सह संपर्कप्रमुख मनोहर घुमे, अमित काताळे, तालुकाध्यक्ष अरुण भुवड, महिला आघाडी अध्यक्ष श्रावणी शिंदे, विधानसभा महिला आघाडी प्रमुख ऐश्वर्या कातकर, स्वप्नाली डावल, तालुका सचिव श्री श्वेतांबरी मोहिते, तृप्ती शिगवण, गजानन मांडवकर,लोटे विभाग प्रमुख सुभाष हुमणे, तालुका उपाध्यक्ष संतोष पाष्टे, युवक अध्यक्ष विवेक जांगली, विनायक घाणेकर, नामदेव अवरे आदी. महिला - पुरुष कार्यकर्ते, पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg