loader
Breaking News
Breaking News
Foto

श्रीमान आर.जी.काते विद्यामंदीर धामणी पंचक्रोशी विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा ठाण्यात रंगला ‘जिव्हाळ्याचा मेळावा’

ठाणे : २०१८ साली संदीप बिरवटकर आणि सहकार्‍यांनी रोवलेले हे रोपटे आज एक वटवृक्ष बनले आहे. असे प्रतिपादन आर जी काते विद्यामंदिर चे चेअरमन अजय बिरवटकर यांनी सांगितले. तसेच पुढे बोलतांना त्यांनी पटसंख्या वाढीसाठी लवकरच प्रयत्न सुरू करण्यात येणार असून वसतिगृह उभारण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील असे आश्वासन त्यांनी दिले. माजी विद्यार्थी सेवा संस्थेच्यावतीने माजी विद्यार्थी स्नेसंमेलन आणि दिनदर्शिका प्रकाशनाचा कार्यक्रम ठाण्यातील नरेंद्र बल्लाळ सभागृह येथे आयोजित केला होता, त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून विलासराव (नाना) शिंदे, सदस्य, समन्वय समिती (दक्षिण विभाग), रयत शिक्षण संस्था, सातारा उपस्थित राहिले होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

तसेच अजयशेठ बिरवटकर, चेअरमन, स्थानिक स्कूल कमिटी; ह. स. खताते, माजी चेअरमन व सल्लागार; आणि अंकुश शेठ काते, सल्लागार, स्थानिक स्कूल कमिटी, सखाराम कदम, स्थानिक स्कुल कमिटी, यशवंतराव कदम, अध्यक्ष झोलाईदेवी मंदिर ट्रस्ट, बबन शिंदे, माजी अध्यक्ष, झोलाई देवी मंदिर ट्रस्ट, जगदीश शिंदे, काशिनाथ डीगे हे मान्यवर उपस्थित होते. शाळेच्या दिवसांना उजाळा देण्याचा प्रयत्न माजी विद्यार्थ्यांनी केला असून, शाळेच्या प्रगतीचा प्रवास पुन्हा अनुभवण्याची आणि जुने बंध दृढ करण्याची ही अनोखी संधी ठरणार आहे, असे मत उपस्थित गुरुजनांनी व्यक्त केले, त्या वेळी गुरुजनांचा ऋणपत्र देऊन कृतन्यता व्यक्त करण्यात आली.

टाईम्स स्पेशल

संघटनेचे खजिनदार संदीप चिले यांनी सांगितले की, माजी विद्यार्थी सेवा संस्था (रजि.) ही कोकणातील एकमेव संघटना आहे जी शाळेत शिकणार्‍या विध्यार्थ्याना सर्व शाळापयोगी सुविधा उपलब्ध करून देत आहे, असेही त्यांनी नमूद केले. तर संघटना कशाप्रकारे स्थापन करण्यात आली याच विवेचन विनोद गोगावले यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी संस्थेच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन अजय बिरवटकर यांच्या वतीने करण्यात आल. अजय कदम आणि मिलिंद कदम यांनी सुनियोजित पणे संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. शैक्षणिक कार्यात सातत्य, नात्यांमध्ये आपुलकी आणि समाजाशी असलेले ऋण सन्मानाने फेडण्याचा संकल्प या मेळाव्यातून व्यक्त केल्याचे आयोजकांनी सांगितले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg