loader
Breaking News
Breaking News
Foto

नांदेड-पनवेल रेल्वे कल्याणमार्गे सावंतवाडीपर्यंत नेण्याची मागणी

बदलापूर येथील रत्नागिरी-सिंधुदुर्ग रहिवासी मंडळाने येथील खासदार बाळ्या मामा म्हात्रे यांची भेट घेऊन रेल्वे संदर्भातील विषयाकडे निवेदनाद्वारे लक्ष वेधले. त्यात प्रामुख्याने नांदेड-पनवेल एक्सप्रेसचा सावंतवाडी पर्यंत विस्तार करणे, सावंतवाडी येथील अपूर्ण टर्मिनस केंद्राच्या अमृत भारत स्थानक योजनेतून करणे, आणि सावंतवाडी स्थानकात १२१३३/३४ मुंबई मंगलोर एक्सप्रेसचा थांबा मिळणे आदी विषय होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

निवेदनात लिहिले आहे की, सध्या कल्याण आणि कोकण दरम्यान थेट दैनंदिन रेल्वेसेवेची मागणी होत आहे. या पार्श्वभूमीवर, गाडी क्र. १७६१३/१४ नांदेड-पुणे-पनवेल एक्सप्रेसचा मार्ग कल्याण जंक्शनमार्गे वळवून ती सावंतवाडी रोडपर्यंत वाढवण्यात यावी. यामुळे पुणे, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर परिसरातील प्रवाशांना कोकणात जाण्यासाठी थेट दैनंदिन रेल्वेसेवा मिळेल.

टाइम्स स्पेशल

तसेच सावंतवाडी टर्मिनसच्या दुसर्‍या टप्प्याचे काम अपुर्‍या निधीमुळे थांबले आहे. ’अमृत भारत स्टेशन योजने’ अंतर्गत या कामासाठी निधी मंजूर करून नवीन प्लॅटफॉर्म, शेड, पाण्याची व बसण्याची सोय आणि फूट-ओव्हर ब्रिजचा विस्तार करावा. तसेच, वाढत्या रात्रीच्या प्रवासी संख्येचा विचार करून गाडी क्र. १२१३३/३४ मुंबई उडचढ - मंगळोर एक्सप्रेसला सावंतवाडी येथे थांबा देण्यात यावा. ङ्गयावेळी या मंडळाच्या अध्यक्षा संगीता चेंदवणकर, उपाध्यक्ष गिरीश राणे, सचिव महेश सावंत, व संघटनेचे इतर पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg

खासदार बाळ्या मामा म्हात्रे यांना निवेदन

foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg