loader
Breaking News
Breaking News
Foto

सावंतवाडी नगरपरिषद निवडणूक: युतीच्या घोळामुळे इच्छुकांच्या प्रचाराला 'ब्रेक'

​सावंतवाडी (प्रतिनिधी) - ​तब्बल आठ वर्षांच्या मोठ्या खंडानंतर सावंतवाडी नगरपरिषदेची सार्वत्रिक निवडणूक होत असताना, भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांच्यात सुरू असलेल्या महायुतीच्या चर्चेमुळे इच्छूक उमेदवारांच्या प्रचाराला अचानक 'ब्रेक' लागला आहे. युतीच्या भानगडीत आपला पत्ता कट होणार की काय, या विवंचनेत अनेक उमेदवारांनी आपला प्रचार थंडावला आहे. ​नगराध्यक्ष आणि नगरसेवकपदाच्या उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्या अनेकांनी लोकांना भेटून तयारी सुरू केली होती आणि आवश्यक असलेली नगरपरिषद थकबाकीही भरली होती. मात्र, आता युतीच्या चर्चेने त्यांच्या अपेक्षांवर पाणी फिरण्याची भीती निर्माण झाली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सावंतवाडी नगरपरिषदेवर तीन वर्षे प्रशासकीय राजवट होती आणि त्यापूर्वी पाच वर्षे लोकनियुक्त मंडळ कार्यरत होते. अशाप्रकारे सुमारे आठ वर्षांनंतर हा निवडणुकीचा योग जुळून आला होता. त्यामुळे स्थानिक राजकारणात मोठा उत्साह संचारला होता. सर्व प्रमुख पक्षांनी स्वबळावर लढण्याची तयारी दर्शवली होती. ​अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटाने चर्चेत सहभागी नसतानाही नगराध्यक्ष पदाचा उमेदवार जाहीर करून आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ​सत्ताधारी महायुतीचे (भाजप आणि शिवसेना शिंदे गट) इच्छूक उमेदवार मात्र सध्या संभ्रमात आहेत. ​भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांच्यातील युतीची चर्चा अंतिम टप्प्यात असून, कोणत्या जागेवर कोणाला उमेदवारी मिळणार, यावरून जोरदार रस्सीखेच सुरू आहे. यामुळे प्रभागात फिरणारे आणि जोमाने प्रचार करणारे अनेक उमेदवार थांबले आहेत. ​निवडणूक आयोगाने प्रचारासाठी दिलेला वेळही कमी असताना, युतीच्या या घोळामुळे इच्छुकांत चिंतेचे वातावरण आहे. "एवढा प्रचार करून काय उपयोग, जर उमेदवारीच मिळाली नाही तर?" असे प्रश्न उपस्थित होत असल्याने अनेक ठिकाणी निवडणुकीची रणधुमाळी थंडावल्याचे चित्र आहे. ​या नगरपरिषद निवडणुकीतील युतीचा तिढा कधी सुटतो आणि त्यानंतर प्रत्यक्षात उमेदवारी कोणाला मिळते, याकडे आता सावंतवाडीकरांचे लक्ष लागले आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg