loader
Breaking News
Breaking News
Foto

नागरिकांच्या प्रलंबित प्रश्नांना न्याय द्यायचा असेल तर मोदी, फडणवीस यांचे नेतृत्व मानणे गरजेचे : रविंद्र चव्हाण

खेड (दिवाकर प्रभु) : नागरीकांच्या प्रलंबित प्रश्नांना न्याय दयायचा असेल तर केंद्रातील दूरदृष्टी नेता पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्यातला द्रष्टा नेता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व मानणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. रविद्र चव्हाण यांनी केले आहे. ते खेडचे माजी न‌गराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी शहरातील स्व: मीनाताई ठाकरे नाट्यगृहात बुधवारी आयोजित केलेल्या कार्यकर्ता संवाद मेळावा व पक्षप्रवेश सोहळ्याप्रसंगी बोलत होते. वेळी जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, तालुकाध्यक्ष विनोद चाळके, ऋषिकेश मोरे, माजी जिल्हाध्यक्ष केदार साठे, माजी आमदार विनय नातू व सूर्यकांत दळवी, शहराध्यक्ष अनिकेत कानडे, प्रशांत यादव आदींसह भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी प्रदेशाध्यक्ष श्री. चव्हाण म्हणाले की, गेली काही वर्षे मनसेत नेते म्हणून अतिशय चांगले काम करणाऱ्या वैभव खेडेकर यांचे सामाजिक काम खेडच नव्हे तर कोकणवासियांना ज्ञात आहे. त्यांनी सर्वांशी चांगले संबंध प्रस्थापित करून आपल्या नावाचा वेगळा ठसा उमटविला आहे. पंत‌प्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आपणास काम करण्याची संधी मिळावी अशी इच्छा त्यांनी आपल्याकडे बोलून दाखविल्यानंतर पक्षातील माझ्या सर्व सहकाऱ्यांशी त्यांची इच्छा सांगितली.त्यांना नाही म्हणण्याचा प्रश्नच नव्हता, उलट एक खंबीर नेता आपल्यासोबत जोडला जातोय हि समाधानाचीच बाब असल्याने त्यांना पक्षात घेण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर आपल्यासोबत माझे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते भाजपाबरोबर जोडू इच्छित असल्याचे त्यांनी सांगितल्यानंतर आज हा कार्यकर्ता संवाद मेळावा व पक्षप्रवेश सोहळा घेण्यात आल्याचे श्री. चव्हाण यांनी स्पष्ट केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

श्री. चव्हाण पुढे म्हणाले, एक परिवार, एक कुटुंब म्हणून पक्षाला बळकटीसाठी काम करू या. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत, यावेळी नागरी सुविधा, समस्या आणि ज्या बाबी नागरीकांच्या हिताच्या असतील त्या पूर्णत्वास नेण्यासाठी एक विचाराने पुढे गेले पाहिजे. राजकारण राजकारणाच्या जागीच असू शकते. पण नागरिकांच्या प्रलंबित प्रश्नांना न्याय द्यायचा असेल तर मोदी, फडणवीस यांचे नेतृत्व मानणे गरजेचे असून जो विश्वास आपण लोकांना देणार आहोत त्याला तडा न देता नागरिकांना सुविधा देण्यास कटिबद्ध राहिले पाहिजे, असे त्यांनी सांगितले. यावेळी प्रदेशाध्यक्ष श्री.चव्हाण यांनी भाजपात प्रवेश केलेल्या शेकडो कार्यकर्त्यांचे स्वागत करून तुमचा यथोचित सन्मान पक्षात केला जाईल असे सांगितले. तसेच अनेकांना विविध पदांची जबाबदारी देऊन त्यांना नियुक्तीपत्रे देण्यात आली.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg