loader
Breaking News
Breaking News
Foto

सोनुर्ली श्री देवी माऊलीचा जत्रोत्सव

सावंतवाडी (प्रतिनिधी) - भक्तांच्या अलोट गर्दीत,आई माऊलीचा जयघोष करत हजारो पुरुष ,महीला भाविकांनी सोनुर्ली येथील श्री देवी माऊली चरणी लोटांगण घालून आपला नवस फेडला, गुरुवारी रात्रौ देवीच्या प्रांगणात जत्रौत्सवात पार पडलेला हा नयनरम्य क्षण पाहण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक भक्ताची गर्दी उसळली होती. तर दुसर्‍या दिवशी शुक्रवारी तुलाभाराने आणि देवीच्या कौलाने जत्रोत्सवाची उत्साहात सांगता झाली. दक्षिण कोकणचे प्रतिपंढरपूर म्हणून ओळख असलेल्या सोनुर्ली श्री देवी माऊलीचा दोन दिवस चालणाऱ्या लोंटागणाच्या जत्रोत्सवाला गुरुवारी रात्रौ दरवर्षी प्रमाणे तुफान गर्दी उसळली, यावेळी मंदिराकडे जाणारे रस्ते आणि परिसर भक्तांच्या गर्दीने फुलून गेले होते. दिवसभर असलेल्या तुरळक गर्दीचे रुपांतर रात्रौ आठनंतर भाविकांचा जनसागरात पाहायला मिळाले. रात्रौ ठिक साडेदहा वाजता देवीची पालखी कुळघराकडून वाजत गाजत फटाक्याच्या आतषबाजीत मंदिरात दाखल झाल्यानंतर विधीवत प्रथेप्रमाणे अकरा वाजता लोटांगणाच्या मुख्य कार्यक्रमाला सुरवात झाली. तत्पूर्वी भाविक भक्तांना देवीचे दर्शन आणि ओटी केळी ठेवण्याचे काम अविरत सुरु होते. पालखी मंदिरात आल्यानंतर हा कार्यक्रम बंद ठेवण्यात आला. त्यानंतर मंदिराच्या सभामंडपाच्या पायरीपासून लोटांगणाला सुरूवात झाली व मंदिराला प्रदक्षिणा पूर्ण करीत त्याच पायरीपर्यंत येऊन ती पूर्ण केली. नवसकरी पुरुष भक्तांनी झोपून जमिनीवरुन लोटांगणे घातली. तर महीलांनी उभ्याने चालत लोंटागणे घातली. सपुर्ण मंदिराभोवती एक प्रदक्षिणा घालून हे लोटांगण पूर्ण केले जाते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दरवर्षी प्रमाणे यावर्षीही हजारो महीला पुरुष भक्तांनी लोटांगण घालून आपल नवस फेड केला. यावर्षीही महिला भाविकांची संख्या लक्षणीय होती. लोंटागणाचा कार्यक्रम सुरु होताच श्रीदेवी माऊलीच्या अवसारांनी तरंगकिठीसह भक्तांना दर्शन दिले. हा कार्यक्रम उशिरापर्यंत सुरू होता पुरुष भाविकांची लोटांगणे पार पडतात महिलांची लोटांगणे झाली. हजाराहून जास्त महिला व पुरुष भाविकांनी देवी चरणी लोटांगण अर्पण केले. नवसकरी भावीक भक्तांना लोटांगण घालताना कुठल्याही प्रकारची अडचण येऊ नये यासाठी अनेकांचे हात पुढे सरसावले होते. मंदिराभोवती लोटांगणाचा कार्यक्रम पाहण्यासाठी मोठी गर्दी होती. दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी खास नियोजन पोलीस यंत्रणे करून करण्यात आले होते. खुद्द पोलीस अधीक्षक डॉ मोहन दहीकर यांनी या जत्रोत्सवाला हजेरी लावत पोलीस बंदोबस्त बाबत माहिती घेतली. तर संपूर्ण जत्रोत्सव पार पडेपर्यंत सावंतवाडी पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण हे जातीनिशी सर्व हालचालींवर लक्ष ठेवून होते. तब्बल दोन तासाहून अधिक वेळ पुरुष भक्ताची लोटांगणे सुरु होती. त्यानंतर महिलांची लोटांगणे सुरु झाली. देवस्थान कमिटीकडून यावर्षी लोटांगण घालणाऱ्या महिला पुरुष भक्तासांठी आंघोळीसाठी खास व्यवस्था करण्यात आली होती. नव्याने उभारलेल्या इमारतीमध्ये ही व्यवस्था होती.

टाइम्स स्पेशल

जत्रेचा दुसरा दिवस हा गावातील गावकरी मंडळी केळीकुळ यांना देवीच्या दर्शनासाठी आणि ओटी भरण्यासाठी राखीव ठेवला जातो. त्यामुळे जत्रेच्या दुसऱ्या दिवशी सकाळपासूनच गावातील गावकर मंडळी आणि केळी कुळाने देवीच्या दर्शनासाठी आणि ओटी भरण्यासाठी मोठी गर्दी केली होती. याचवेळी सुरू असलेल्या आगळ्यावेगळ्या तुलाभार कार्यक्रमालाही मोठी गर्दी पाहायला मिळाली. अडी अडचण असलेल्या भाविकांनी आपल्या वजनाएवढे वस्तू देऊन नवस फेड करतात. हा कार्यक्रम उशिरापर्यंत सुरु होता. त्यानंतर पिचाच्छ बाधा झालेल्यांना देवी माऊलीच्या अवसारी संचाराकडून ती बाधा दूर केली जाते. हा कार्यक्रम आहे बराच वेळ सुरू होता. दुपारनंतर देवीच्या संचारी अवसाराने जत्रोत्सव पार पडल्याच्या कौल दिल्यानंतर जत्रौत्सवाची सांगता झाली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg