loader
Breaking News
Breaking News
Foto

देवबागमध्ये मोकाट गुरे पकड मोहीम

मालवण (प्रतिनिधी) - पर्यटन गाव असलेल्या देवबाग गावात मोकाट गुरांच्या संचार मोठ्या प्रमाणावर वाढल्याने देवबाग ग्रामपंचायतीच्यावतीने मोकाट फिरणाऱ्या ९ गुरांना पकडण्यात आलेले आहे. ही मोहीम नियमितपणे सुरू राहणार असल्याचे सरपंच उल्हास तांडेल यांनी स्पष्ट केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

पकडलेल्या मोकाट गुरांच्या मालकांनी २४ तासाच्या आत संबंधित मालकांनी स्वतःची गुरे असल्यास दंड व खर्च जमा करून ताब्यात घ्यावीत. अन्यथा सदरची गुरे गोशाळेत जमा करण्यात येतील मागाहून कोणत्याही प्रकारची तक्रार स्वीकारली जाणार नाही, असेही सरपंच उल्हास तांडेल यांनी स्पष्ट केले आहे. देवबाग गावात सातत्याने मोकाट गुरांच्या संचाराचा प्रश्न निर्माण झाल्याने ग्रामपंचायतीकडून सदरची मोहीम हाती घेण्यात आली होती. यामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg