loader
Breaking News
Breaking News
Foto

अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती स्थिर, अफवांवर विश्वास ठेवू नका ; सनी देओल याचे चाहत्यांना आवाहन

मुंबई:बॉलिवूड इंडस्ट्रीतील दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांच्या प्रकृतीविषयी महत्त्वपूर्ण अपडेट समोर येत आहे. धर्मेंद्र यांची तब्येत नाजूक असून ते व्हेंटिलेटरवर असल्याचं कळतंय. डॉक्टरांची एक टीम त्यांच्या प्रकृतीचं सातत्याने निरीक्षण करत आहे. धर्मेंद्र यांना 31 ऑक्टोबर रोजी नियमित तपासणीसाठी रुग्णालयातत दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर आता ते व्हेंटिलेटरवर असल्याची माहिती समोर येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, धर्मेंद्र यांची प्रकृती खालावल्याने त्यांना काल (सोमवार) आयसीयूमध्ये व्हेंटिलेटरवर शिफ्ट करण्यात आलं आहे. सध्या ते उपचारांना प्रतिसाद देत असल्याचंही समजतंय. परंतु धर्मेंद्र यांच्या कुटुंबीयांनी किंवा रुग्णालयाने अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही. याआधी 3 नोव्हेंबर रोजी धर्मेंद्र यांची दुसरी पत्नी आणि ज्येष्ठ अभिनेत्री हेमा मालिनी यांनी त्यांच्या तब्येतीविषयी अपडेट दिली होती. दरम्यान अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती स्थिर, अफवांवर विश्वास ठेवू नका ; सनी देओल याचे चाहत्यांना आवाहन केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

हेमा मालिनी यांना एअरपोर्टवर पापाराझींनी विचारलं होतं की, “सर्वकाही ठीक आहे का?” तेव्हा त्यांनी हाथ जोडून म्हटलं होतं की, “ठीक आहे.” धर्मेंद्र यांच्या प्रकृतीविषयीही विचारणा झाली असता त्यांनी सर्वकाही ठीक असल्याचं सांगितलं होतं. याच वर्षी एप्रिल महिन्यात धर्मेंद्र यांच्या डोळ्यांची सर्जरी झाली होती. त्यांची दृष्टी कमी झाल्याने डोळ्यांच्या कॉर्निया ट्रान्सप्लांटची सर्जरी करण्यात आली होती. याशिवाय त्यांच्यावर मोतीबिंदूचीही शस्त्रक्रिया झाली होती. तेव्हा मुंबईतील रुग्णालयाबाहेर येताना त्यांचा एक व्हिडीओसुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. “माझ्यात खूप दम आहे. अजूनही मी ठीक आहे”, असं ते पापाराझींना या व्हिडीओत म्हणताना दिसले होते.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg