loader
Breaking News
Breaking News
Foto

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा रत्नागिरी च्या वतीने रंगभूमी दिन साजरा

रत्नागिरी - अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा रत्नागिरी च्या वतीने रंगभूमी दिन साजरा करण्यात आला. सदर प्रसंगी कडवई तालुका संगमेश्वर येथील प्रख्यात अभिनेते डॉक्टर भगवान नारकर यांच्या शुभहस्ते आणि नाट्य परिषद शाखा चिपळूणचे कार्यकारणी सदस्य आणि नाट्य व्यवस्थापक योगेश कुष्टे यांच्या प्रमुख उपस्थितीत नटराज पूजन करून कार्यक्रम संपन्न झाला. सदर प्रसंगी अभिनेत्याने रंगभूमीची सेवा करत असताना शरीर स्वास्थ्य कसे जपावे याबाबत डॉक्टर नारकर यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच त्यांनी चौकट राजा या चित्रपटातील दिलीप प्रभावळकर यांच्या भूमिकेतील एक प्रसंग सादर केला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सदर प्रसंगी जेष्ठ रंगकर्मी आणि प्रकाशयोजनाकार विनय राज उपरकर नामवंत अभिनेते दीपक कीर, योगेश सामंत, चंद्रशेखर आंबेरकर, विलास जाधव, नरेश पांचाळ, आणि नाट्य परिषद शाखा रत्नागिरीचे सर्व कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg