loader
Breaking News
Breaking News
Foto

संदीप घाणेकर यांना बॅडमिंटन स्पर्धेमध्ये विजेतेपद

खेड (प्रतिनिधी) - महाराष्ट्र राज्यातील राज्य मंडळाच्या अधिनस्त सर्व शासकीय स्थानिक स्वराज्य संस्था अनुदानित प्राथमिक उच्च प्राथमिक व माध्यमिक शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व अधिकारी यांच्यासाठी 42 स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यापैकी खेड तालुका अंतर्गत पार पडलेल्या क्रीडा स्पर्धेतील बॅडमिंटन या प्रकारात बिजघर नं. 1 शाळेचे पदवीधर शिक्षक संदीप घाणेकर यांनी आपल्या उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत अंतिम विजेतेपद खेचून आणले

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

संदीप घाणेकर यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल नुकताच बिजघर शाळेमध्ये त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पदवीधर शिक्षक विजय सकपाळ त्याचप्रमाणे शैलेश पराडकर यांनी त्यांना जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. संदीप घाणेकर यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल बिजघरनं 1 शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष भगवान जंगम, केंद्रप्रमुख महेंद्र जाधव, खोपी प्रभागाचे शिक्षण विस्तार अधिकारी सुनील वरेकर, खेडचे गटशिक्षणाधिकारी विजय बाईत यांनी अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg