loader
Breaking News
Breaking News
Foto

कलमठच्या काशीकलेश्वराचे ना . नितेश राणे यांनी घेतले दर्शन

कणकवली (प्रतिनिधी)- त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त कलमठ गावचे गामदैवत श्री काशीकलेश्वराच्या जत्रोत्सवाला पालकमंत्री नितेश राणे यांनी सहभाग घेत श्री देव कलेश्वराचे दर्शन घेतले. यावेळी मंत्री राणे यांचे देवस्थानाच्या मानकरी यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तसेच कलमठ ग्रामस्थांच्यावतीने मंत्री नितेश राणे यांचा शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह देऊन मानकरी सुनील नाडकर्णी व सरपंच संदीप मेस्त्री यांनी स्वागत केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, उपसरपंच दिनेश गोठणकर, माजी उपसरपंच स्वप्नील चिंदरकर, ग्रा.पं.सदस्य सचिन खोचरे, नितीन पवार, बाबू नारकर, गुरु वर्देकर, रामदास विखाळे, विजय चिंदरकर, महेश मेस्त्री, बाळा चिंदरकर, अनंत हजारे, शाम वर्देकर, विनोद कोरगावकर, जयराम चिंदरकर, अभि गुरव, समीर गुरव, बबन गुरव,प्रथमेश धुमाळे, सुनील मेस्त्री, अनिल मेस्त्री आदी उपस्थित होते. श्री देव कलेश्वराचे मंत्री नितेश राणे यांनी दर्शन घेतल्यानंतर मंदिर परिसरात गार्डनची पाहणी केली. गेली अनेक वर्षे कलमठ वासियांचे मागणी असलेले कलेश्वर गार्डनचा दिलेला शब्द पूर्ण केल्याने आज मंदिर परिसरात उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण आहे. गार्डन कामाबद्दल कलमठ वासियांनी समाधान व्यक्त केले. हे मंत्री ना.नितेश राणे यांचे श्रेय आहे म्हणून कलमठ ग्रामस्थांच्यावतीने सरपंच या नात्याने मी धन्यवाद देतो असे सरपंच संदिप मेस्त्री यांनी सांगितले.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg