loader
Breaking News
Breaking News
Foto

“गाव तिथे रोजगार” संकल्पनेतून महिलांना मोफत प्रशिक्षण राबवणार

वाटद खंडाळा : महिला सक्षमीकरणासाठी “गाव तिथे रोजगार” या संकल्पनेतून महिलांना मोफत प्रशिक्षण उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने नारी शक्ती फाउंडेशन, रत्नागिरी संस्थेच्या संस्थापिका तसेच सेवाभावी प्रबोधन समिती च्या जिल्हाध्यक्षा सौ. संजना ताई मोहिते आणि रत्नसिंधू न्युज मीडियाच्या संस्थापक–संपादक तसेच सामाजिक कार्यकर्त्या सौ. वर्षा राजे निंबाळकर यांची आज वाटद खंडाळा येथे भेट झाली. या भेटीदरम्यान दोघींनी उमेदच्या जीवनज्योती महिला प्रभाग संघाच्या कार्यालयाला भेट देऊन स्थानिक महिला कार्यकर्त्यांशी संवाद साधला. या वेळी सौ. अनुजा सावंत (मास्टर CRP, उमेद बचत गट संस्था, रत्नागिरी), दिक्षा निवळकर (प्रभागसंघ व्यवस्थापक, वाटद), तसेच CRP सौ. गीतांजली जाधव आणि सौ. शुभांगी वनये उपस्थित होत्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी विविध प्रशिक्षण उपक्रम राबविण्याबाबत या बैठकीत सविस्तर चर्चा झाली. विशेषतः वाटद खंडाळा पंचक्रोशीतील गावांमध्ये “एक दिवसीय मोफत प्रशिक्षण शिबिरे” आयोजित करण्याच्या संकल्पनेवर विचारमंथन करण्यात आले. या प्रशिक्षणांद्वारे महिलांना लघु व गृह उद्योग उभारण्यासाठी आवश्यक कौशल्ये दिली जाणार आहेत. नारी शक्ती फाउंडेशन तर्फे “गाव तिथे रोजगार” या उपक्रमातून महिलांना मोफत प्रशिक्षणासोबत गृह उद्योगासाठी लागणाऱ्या विविध प्रकारच्या मशीन अनुदान तत्वावर उपलब्ध करून देण्याची योजना आखण्यात आली आहे. “गुंतवणूक कमी, रोजगाराची हमी” या सामाजिक उपक्रमाद्वारे महिलांना आत्मनिर्भर बनविण्याचा प्रयत्न होत आहे.

टाइम्स स्पेशल

या प्रसंगी सौ. संजना ताई मोहिते यांनी महिलांनी स्वतःच्या प्रगतीसाठी पुढाकार घेऊन या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. दरम्यान, सौ. वर्षा राजे निंबाळकर यांनी या प्रशिक्षण शिबिरांच्या आयोजनासाठी पुढाकार घेतला असून, त्या महिला सक्षमीकरणासाठी विविध संस्थांमार्फत उपक्रम राबवत आहेत. “महिला सक्षम झाल्या तर परिवार सक्षम होईल आणि त्यामुळे समाज सक्षम बनेल,” या विचाराने त्या कार्यरत आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg