loader
Breaking News
Breaking News
Foto

शृंगारतळी येथील श्री नीलकंठेश्वर मंदिर येथे त्रिपुरारी पोर्णिमा उत्सव साजरा

वरवेली (गणेश किर्वे) - गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथील श्री नीलकंठेश्वर मंदिर उत्सव मंडळाच्यावतीने श्री त्रिपुरारी पोर्णिमा उत्सव श्री नीलकंठेश्वर मंदिर येथे विविध कार्यक्रमानी साजरा करण्यात आला. त्रिपुरारी पौर्णिमा कार्यक्रमानिमित्त सायं. त्रिपुर पूजन व नियमित आरती, सायं. ह.भ.प. नारायण महाराज पवार, अडरे - अनारी यांचे किर्तन संपन्न झाले. या कीर्तनामध्ये विसापूर, जामसुत, चिखली, वेळंब वचन वाडी,पाटपन्हाळे, कात्रोळी, निगुंडळ या गावातील वारकऱ्यांनी साथ संगत दिली. तसेच जामसुत येथील विनेश शिरकर यांनी पखवाज वादन, अशोक कुंभार चोपदार, दत्ताराम किर्वे विणेकरी म्हणून काम पाहिले. महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली. या कार्यक्रमासाठी श्री नीलकंठेश्वर मंदिर उत्सव मंडळाचे अध्यक्ष रमेशदादा वेल्हाळ, उपाध्यक्ष मोहन संसारे, सचिव सुदीप चव्हाण, खजिनदार जय गुहागरकर, सल्लागार विश्वास बेलवलकर गुरुजी, कायदेशीर सल्लागार प्रतिष्ठित वकील अॅड. सुशील अवेरे, विश्वस्त श्रीकृष्ण बेलवलकर, मनोज कोळवणकर, राजकुमार वराडकर, संजय पवार, प्रफुल विखारे व सर्व सभासद तसेच सर्व भाविक यांनी मेहनत घेतली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg