loader
Breaking News
Breaking News
Foto

खेड नगराध्यक्ष पदासह २० नगरसेवकांपैकी १७ नगरसेवक निवडून आणण्याचा महाविकास आघाडीचा निर्धार

खेड (वार्ताहर) - येथील नगरपरिषदेची निवडणूक जाहीर झाली असून या निवडणुकीत खेड नगराध्यक्ष पदासह २० नगरसेवकांपैकी १७ नगरसेवक निवडून आणण्याचा निर्धार महाविकास आघाडीच्या वतीने करण्यात आल्याची माहिती शहरातील कुंभारआळी येथील कॉंग्रेस कार्यालयात सोमवारी घेतलेल्या पत्रकारपरिषदेत देण्यात आली. महाविकास आघाडीने खेडच्या निवडणुकीसाठी एकजूट निर्माण केली असून नगरपरिषदेवर सुद्धा महाविकास आघाडीचा झेंडा फडकविण्याचा निर्धार सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी केला आहे. पत्रकार परिषदेत महाविकास आघाडीच्या पदाधिकार्‍यांनी हा निर्णय एकजुटीने बोलून दाखविला आहे, यावेळी उद्धव ठाकरे गटाचे बाळा खेडेकर, कॉंग्रेसचे गौस खतीब, उद्धव ठाकरे शिवसेनेचे शहरप्रमुख चंद्रशेखर पाटणे, कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष अजीम सुर्वे आदी पदाधिकार्‍यांसह कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना, इंदिरा कॉंग्रेस, शरद पवार राष्ट्रवादी कॉंग्रेस व मनसे यांची महाविकास आघाडी निर्माण झाली असून हे सर्व पक्ष शक्तीनिशी एकत्र आले आहेत. त्यामुळे येत्या निवडणुकीत महाविकास आघाडी निश्चितच आपला दबदबा निर्माण करेल अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे. पाच वर्षात येथील जनतेला भयंकर त्रास झाला आहे. रस्ता, पाणी हे विषय तर नेहमीचेच झालेले आहेत. त्यामुळेच उद्धव ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव, कॉंग्रेसचे हुसेन दलवाई, रमेश कीर आदींनी महाविकास आघाडीच्या वतीने यश मिळवण्यासाठी प्रयत्न केले आहेत.

टाइम्स स्पेशल

मूलभूत सुविधांचा अभाव, खराब रस्ते यांच्यासह आतापर्यंत पोकळ आश्वासने दिली गेली. त्यामुळे येत्या निवडणुकीत खेडची जनता मतदानाच्या माध्यमातून आपला संताप व्यक्त करणार असल्याचा दावा गौस खतीब यांनी केला आहे. तर खेडची जनता विकासाच्या बाजूने असल्याचा दावा बाळा खेडेकर यांनी करून येथील जनता कोणाच्याही भुलथापांना न भुलता विकासाच्या बाजूने असणार असल्याचे सांगितले. एकमेकांवर आरोप करणारे, चौकश्या लावणारे आता सत्तेचा मलिदा लाटण्यासाठी एकत्र आले आहेत. मात्र आम्ही यांचा भ्रष्टाचार जनतेसमोर आणल्याशिवाय राहणार नाही, असे बाळा खेडेकर यांनी सांगितले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg