loader
Breaking News
Breaking News
Foto

दापोलीच्या किनाऱ्यावर वाढली पक्ष्यांची वर्दळ; हिवाळ्याची चाहूल

संगलट खेड (इक्बाल जमादार) - दापोलीच्या समुद्रकिनाऱ्यावर हिवाळ्याची चाहूल लागताच सिगल पक्ष्यांची वर्दळ वाढू लागली आहे. सिगल पक्षांचे आगमन जणू काही दापोलीच्या पर्यटनाचा उत्सवच आहे. निळ्याशार समुद्राच्या लाटांवर खाद्याच्या शोधात झेपावणारे सिगल पक्ष्यांचे थवे पर्यटकांना आकर्षित करत आहेत. हा मोहक नजारा पाहण्यासाठी पर्यटकांनी चांगलीच गर्दी होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या सिगल पक्ष्यांचे थवे आणि त्यांच्या हालचाली टिपण्यासाठी दूरवरून पर्यटक दापोलीच्या किनाऱ्याला भेटी देत आहेत. थंड वाऱ्याची सुरुवात आणि शांत सकाळ या पक्ष्यांसाठी अनुकूल वातावरण निर्माण करत असल्याने दापोली, मुरूड, हर्णे आणि आंजर्ले या किनाऱ्यांवर त्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

टाइम्स स्पेशल

सिगल पक्ष्यांची झेप आणि त्यांच्या चपळ हालचालींनी दापोलीच्या किनाऱ्यावरील निसर्गसौंदर्यात आणखी भर पडली आहे. हिवाळ्यात या पक्ष्यांचे दर्शन हे आता दापोलीच्या किनाऱ्याचे खास वैशिष्ट्य बनले असून, निसर्गप्रमी आणि छायाचित्रकारांसाठी ही खऱ्या अथनि एक रम्य पर्वणी ठरत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg

सिगल' ची मोहक झेप पर्यटकांना खुणावतेय!

foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg