loader
Breaking News
Breaking News
Foto

नगराध्यक्ष पदासाठी इच्छुकांची गर्दी

वेळणेश्वर (उमेश शिंदे) - काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या नगरपंचायत निवडणुकीसाठी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीसाठी इच्छुकांची गर्दी झाल्याचे माहिती मिळत आहे. यामध्ये महाविकास आघाडी कडून पारिजात कांबळे, स्नेहा भागडे, स्नेहा वरंडे या तीन इच्छुक असल्याची माहिती सूत्राने दिली. यापूर्वी स्नेहा भागडे आणि स्नेहा वरंडे यांनी गुहागर नगरपंचायतीचे नगराध्यक्ष पद भूषवले असून आता पुन्हा त्यांनी नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक म्हणून मुलाखती दिल्या आहेत. तर पारिजात कांबळे या प्रथमच नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक उमेदवार म्हणून त्यांनी ही मुलाखत दिली आहे. याआधी त्यांनी नगरसेवक पदासाठी निवडणूक लढवली होती त्यांचा दोन मतांनी पराभव झाला होता.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दोन डिसेंबर रोजी होणाऱ्या गुहागर नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी नगराध्यक्ष पदासाठी महाविकास आघाडी कडून तीन महिला उमेदवार इच्छुक असल्याची खात्रीशीर सूत्रांनि माहिती दिलि आहे. मात्र अद्यापही या वरती शिक्कामोर्तब झालेल नसून शिवसेनेचे नेते आणि गुहागरचे आमदार भास्कर जाधव हे एका नावावरति लवकरच घोषणा करतिल अशी खात्रीशीर सूत्रांची माहिती आहे. 10 नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार असून 17 नोव्हेंबर रोजी अंतिम दिवस हा उमेदवारी अर्ज भरण्याचा आहे त्याआधी 17 उमेदवार आणि एका नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांची घोषणा येत्या काही दिवसात आमदार भास्कर जाधव हे करणार असल्याची सूत्रांनी माहिती दिली. महायुती होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. महाविकास आघाडी कडून आमदार भास्कर जाधव यांनी सतरा वार्ड साठी 17 उमेदवार आणि नगराध्यक्ष पदाच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या असुन नगराध्यक्ष पदासाठी तीन महिला उमेदवार इच्छुक असून आमदार भास्कर जाधव एका आणि 17 उमेदवारांच्या नावाची घोषणा लवकरच करण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg