loader
Breaking News
Breaking News
Foto

जात पडताळणी अधिकार्‍याच्या विधानाने निवृत्त मुख्याध्यापक एजाज इब्जी दुखावल्याची भावना, चौकशीची मागणी

रत्नागिरी (वार्ताहर) - रत्नागिरी नजीकच्या मजगाव येथील एजाज एब्जी हे निवृत्त मुख्याध्यापक असून लोकांसाठी सातत्याने सामाजिक कार्य करीत असतात. अनेक लोकांचे प्रलंबित प्रश्‍न शासन दरबारी मांडत असतात. त्यामुळे समाजसेवक म्हणून त्यांची ओळख आहे. लोकांसाठी ते निस्वार्थीपणे झटत असतात. पण दिव्यांग असून त्यांच्यावरच जेव्हा जातपडताळणीचे अधिकारी आळ आणतात, तेव्हा प्रचंड दुःख होते. याबाबतची भावना निवृत्त मुख्याध्यापक एजाज इब्जी यांनी टाइम्सकडे मांडली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मजगांव येथील एका व्यक्तीने जातपडताळणी प्रमाणपत्रासाठी अर्ज केला. या अर्जासोबत आपल्या सख्ख्या पुतणीचा सुमारे पंधरा वर्षापूर्वी जातप्रमाणपत्र पडताळणी समितीने दिलेला वैद्य जातप्रमाणपत्र दाखला सोबत जोडला. त्या अर्जात काही त्रुटी असू शकतात. त्यामुळे अर्जदारास नोटीस बजावण्यात आले. मात्र हे नोटीस बजावताना तर जातपडताळणी प्रमाणपत्र देणार्‍या संशोधन अधिकार्‍यांने नोटीसात असे नमूद केले की उर्दू शाळेत जात लिहिण्याची पद्धत नाही. तुमचे भाऊ एजाज इब्जी हे शिक्षक असल्याने त्यांनी शाळेच्या नोंद वहीत जात घुसडली आहे.

टाइम्स स्पेशल

एजाज इब्जी या जागृत शिक्षकाने आपल्या पाल्यांच्या शाळा प्रवेश अर्जात संविधानिक अधिकारानुसार जातीची रितसर नोंद करणे चुकीचे आहे का? जातीची नोंद करताना उर्दू आणि मराठी शाळांना वेगवेगळे नियम लावले जातात का? शासकीय दप्तरात माहिती घुसडता येते का? असे अनेक प्रश्न या निवृत्त शिक्षकासमोर उभे राहिले आहेत. सुमारे पंधरा वर्षापूर्वी योग्य ती तपासणी करून तसेच मजगांव येथील सुमारे पंच्याहत्तर ते ऐंशी वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकांचे गृह चौकशीत जबाब घेऊन वैद्य जातप्रमाणपत्र दाखला देण्यात आलेला आहे. तो दाखला कोणत्या आधारावर खोटा ठरवण्याचा जातप्रमाणपत्र अधिकार्‍यांनी प्रयत्न केला आहे. एजाज इब्जी हे दिव्यांग व्यक्ती असून अत्यंत कार्यकुशलतेने इमानेइतबारे तसेच जबाबदारीने सेवा केली आहे. अधिकार्‍याच्या बेजबाबदार विधानाने दिव्यांग निवृत्त मुख्याध्यापक एजाज इब्जी दुखावले गेले आहेत. त्यामुळे या प्रकरणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे चौकशीची मागणी केली आहे. मुख्यमंत्र्यांंच्या कार्यालयाने त्यांना ईमेल द्वारे त्यांना दिलासा दिला आहे. असे ग्रामस्थांतून सांगितले जात आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg