loader
Breaking News
Breaking News
Foto

कुंभारमाठ येथील बंद चिरेखाणीत १६ वर्षीय मुलीचा बुडून करुण अंत

मालवण (प्रतिनिधी) - कुंभारमाठ गोवेकरवाडी येथे असलेल्या एका बंद चिरे खाणीतील साचलेल्या पाण्यात आंघोळीसाठी उतरलेले सहा जण बुडल्याची घटना सोमवारी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास घडली. यात करिश्मा सुनील पाटील या सोळा वर्षीय मुलीचा बुडून मृत्यू झाला आहे. तर पाच जणांना वाचविण्यात यश आले असून यातील अत्यवस्थ बनलेल्या अंजली प्रकाश गुरव या महिलेवर मालवण ग्रामीण रुग्णालयात उपचार करून अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

याबाबत मिळालेल्या माहिती नुसार कुंभारमाठ गोवेकरवाडी येथील लोंढे यांच्याकडे दिवाळी सुट्टी निमित्त मुंबई येथील अंजली प्रकाश गुरव (वय-३०), गौरी प्रकाश गुरव (वय-१८), गौरव प्रकाश गुरव (वय-२१), करिश्मा सुनील पाटील (वय-१६), दुर्वेश रवींद्र पाटील (वय-९) हे पाच जण आले होते. या पाच जणांसह नंदू सकट हे असे सहाजण सोमवारी सायंकाळी गोवेकरवाडी रस्ता लगतच्या बंद चिरेखाणीत साचलेल्या पाण्यात आंघोळ करण्यासाठी उतरले होते. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने हे सर्वजण पाण्यात बुडू लागले. यावेळी सर्वजण आरडाओरडा करू लागले असता त्यांच्यातील नंदू सकट यांनीच स्वतःसह तात्काळ तिघा जणांना पाण्याबाहेर काढले. याचवेळी रस्त्यावरून जाणाऱ्या राहुल भिसे या तरुणाला हा प्रकार दिसताच त्याने तात्काळ पाण्यात उडी घेत बुडणाऱ्या अंजली गुरव या महिलेला पाण्याबाहेर काढत वाचविले. मात्र यात करिश्मा पाटील ही पाण्यात बुडून बेपत्ता झाली होती. गंभीर स्थितीत असलेल्या अंजली गुरव हिला तात्काळ ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचार करत तिला अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. तर अन्य तीन मुले सुखरूप आहेत.

टाइम्स स्पेशल

या घटनेची माहिती मिळताच कुंभारमाठ पोलीस पाटील विठ्ठल बावकर, आनंदव्हाळ पोलीस पाटील दशरथ गोवेकर यांच्यासह सरपंच पूनम वाटेगावकर, मधुकर चव्हाण, विकास गोवेकर, भाई टेंबुलकर, मनोज वाटेगांवकर यांसह अन्य ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी पाण्यात बेपत्ता झालेल्या करिश्मा हिचा ठावठिकाणा लागत नसल्याने गोवेकरवाडी येथील डॉ राहुल राजूरकर यांनी या घटनेची माहिती भाजपच्या शहराध्यक्ष अन्वेशा आचरेकर यांना देऊन स्कुबा डायवर्सची मागणी केली. सौ. आचरेकर यांनी अजित स्कुबा डायव्हिंग आणि रेहान स्कुबा डायव्हिंगच्या टीमला मदतीसाठी पाठविले. योगेश पांचाळ, आजीम मुजावर यांनी शोध मोहीम दरम्यान, पाण्यात बुडून मृत्यू पावलेल्या करिश्मा पाटील हिचा मृतदेह बाहेर काढला. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक एस. एस. खाडे, जितेंद्र पेडणेकर, अनुप हिंदळेकर, महिला पोलीस कर्मचारी सुप्रिया पवार, श्री. धुरी यांनी घटनास्थळी जात घटनेची माहिती घेतली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg