loader
Breaking News
Breaking News
Foto

मिरवणुकांनी नाणीजक्षेत्री गजानन महाराज प्रकट दिन सोहळा सुरू

नाणीज (वार्ताहर): नाणीजक्षेत्री शनिवारी संतशिरोमणी श्री गजानन महाराज यांचा प्रकट दिन व आद्य जगद्गुरु रामानंदचार्य यांचा जयंती सोहळा याग व निमंत्रण मिरवणुकांनी उत्साहात सुरू झाला. रविवारी मुख्य सोहळा असून रक्तदानात विशेष योगदान देणार्‍यांचा सत्कार करण्यात येणार आहे. तसेच सकाळी लोकसंस्कृतीचे दर्शन घडवणारी भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे. त्याचा आनंद लाखो भाविक घेणार आहेत. जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रेरणेतून ४ ते १८ जानेवारी असे पंधरा दिवस रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. या अवघ्या पंधरा दिवसांत विक्रमी १,७१,१५० बाटल्या रक्त संकलित झाले. हे सर्व रक्त सरकारी रक्तपेढ्यांना देण्यात आले आहे. त्याचा वापर मायक्रोसाइटिक, निमिया, सिकलसेल, थॅलेसिमिया, हिमोफिलिया, ब्लड कॅन्सर, किडनी फेल्युअर अशा गंभीर आजाराशी झुंजणार्‍या रुग्णांना मोफत होणार आहे. म्हणजे नेमक्या गरजूंना हे रक्त मिळणार आहे. रक्तदानाचे पवित्र कार्य व महत्व लक्षात घेऊन या उपक्रमामध्ये योगदान देणारी सेवा केंद्रे, समित्या व प्रेरणादायी व्यक्ती यांचा उद्या सत्कार करण्यात येणार आहे. एका चांगल्या उपक्रमाविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या सोहळ्यासाठी रामानंदचार्य नरेंद्राचार्यजी यांच्यासह रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत, आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर, जलसंधारण मंत्री संजय राठोड, मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्यासह अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दरम्यान शनिवारी वारी उत्सवाला मोठ्या थाटात सुरुवात झाली. सोहळ्याची सुरुवात श्री महामृत्युंजय यागाने झाली. त्यानंतर वाजतगाजत मिरवणुकीने जाऊन देवदेवतांना सोहळ्याची निमंत्रणे देण्यात आली. संपूर्ण सोहळ्याचे पौरोहित्य वे.शा.सं.भालचंद्रशास्री शौचे गुरुजी आणि ब्रह्मवृंद यांनी केले. रविवार सोहळ्याचा मुख्य दिवस आहे. त्यामित्त सकाळी नाथांचे माहेर ते सुंदरगड अशी शोभायात्रा काढण्यात येणार आहे. त्यात अनेक देखावे, कोळी नृत्य, बंजारा नृत्य, भिल्ल वाघ, तूर नृत्य, टिपरी नृत्य, आदिवासी नृत्य असेल. तसेच जोतिबाची सासनकाठी, हलगी व संबळ वादन, भजन अशा भारताच्या लोकसंस्कृतीचे, दर्शन येथे घडणार आहे. शोभायात्रेत रामानंदचार्य नरेंद्राचार्यजी, प.पू.कानिफनाथ महाराज व देशभरातून आलेले साधुसंत यांचे रथ सहभागी असणार आहेत. रात्री प.पू. कानिफनाथ महाराज व जगद्गुरु रामानंदचार्य नरेंद्राचार्यजी यांचे प्रवचन होणार आहे. दरम्यान शनिवारी भाविक मोठ्या संख्येने सुंदरगडावर दाखल झाले आहेत. येथील सद्गुरू कदासिध्येश्वर महाराज रुग्णालयात सकाळी मोफत आरोग्य शिबिर सुरू झाले. त्याचा लाभ भाविक घेत आहेत. तसेच भाविकांसाठी २४ तास महाप्रसादाची सोय काण्यात आली आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg